पुणे : अरबी समुद्रात तयार झालेले ‘बापरजॉय’ चक्रीवादळ येत्या २४ तासांत आणखी उत्तरेकडे सरकणार आहे. बंगालच्या उपसागर ते म्यानमार पर्यंतच्या किनारपट्टीपर्यत असलेला कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता कमी होणार आहे. या अनुकूल स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची आगेकूच सुरूच आहे. पोषक वातावरणामुळे पुढील दोन दिवसांत आनंदघन गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.आहे.

केरळमध्ये तब्बल आठ दिवस विलंबाने मोसमी वारे दाखल झाले. मात्र, त्यानंतर पोषक वातावरणामुळे मोसमी वाऱ्यांचा पुढील प्रवास सुकर होत चालला आहे. सध्या मोसमी वाऱ्यांनी केरळचा उर्वरित भाग, कर्नाटकचा काही भाग, दक्षिणपूर्व बंगालचा उपसागरातील काही भाग, पूर्व मध्य बंगाल बंगालचा उपसागर, ईशान्य बंगालचा उपसागरातील बहुतांश भाग, पश्चिम बंगाल, सिक्कीम या ठिकाणी १० जूनपर्यंत धडक मारली आहे. अरबी समुद्रात तयार झालेले बापरजॉय चक्रीवादळ सध्या मध्यपूर्व अरबी समुद्रात असून पुढील २४ तासांत ते उत्तरेकडे, तर तीन दिवसांत आणखी उत्तरेकडील भागाकडे सरकणार आहे. त्यानंतर या चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. या शिवाय बंगालच्या उपसागरातील उत्तरपूर्व ते दक्षिणपूर्व बांगलादेश ते उत्तर म्यानमारच्या किनारपट्टीपर्यत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तो सध्या उत्तरपूर्व बंगालच्या उपसागरावर असून, त्याची तीव्रता कमी होणार आहे.

हेही वाचा >>>पुणे : पलटी झालेले चारचाकी वाहन वसंत मोरेंनी केले बाजूला, काही मिनिटांत नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका

पूर्व मोसमी पावसाची शक्यता

राज्यातील कमाल तापमनाचा पारा कमी झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात १४ जूनपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वा-यासह अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा कमी होण्याची शक्यता आहे. पुणे शहर आणि आसपासच्या भागातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाजही पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.राज्यात शनिवारी वर्धा येथे कमाल तापमानाचा पारा ४२.८ अंश सेल्सिअसच्या आसपास होता.

Story img Loader