पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात निर्माण झालेले ढगाळ वातावरण आता विरून गेले आहे. राज्यभरात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार आहे. कोरड्या हवामानामुळे किमान तापमानात घट होण्याचा कल आहे. राज्यात सरासरी दोन अंश सेल्सिअसने किमान तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. रविवारनंतर हे ढगाळ वातावरण विरून गेले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. कोरड्या हवामानामुळे किमान तापमान सरासरी दोन अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.सोमवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद सांताक्रुज येथे ३६.६ अंश सेल्सिअस इतकी झाली आहे, तर औरंगाबाद १४.८ येथे सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली आहे.