लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : लक्ष्मीपूजनानिमित्त पुणे मेट्रोची सेवा प्रवाशांसाठी रविवारी (१२ नोव्हेंबर) सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत सुरू राहणार आहे. सायंकाळी सहानंतर मेट्रोसेवा बंद राहणार आहे.
आणखी वाचा-इंद्रायणी काठी, प्रदूषणाची आळंदी… दररोज ‘एवढे’ सांडपाणी मिसळते इंद्रायणी नदीत
महामेट्रोने दिलेल्या माहितीनुसार, पुणे मेट्रोची सेवा पहाटे सहा ते रात्री १० या वेळेत सुरू असते. लक्ष्मीपूजनानिमित्त कर्मचाऱ्यांच्या सोईसाठी ही सेवा सायंकाळी सहापर्यंतच सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मेट्रो सेवा रविवारी सायंकाळी सहा ते रात्री १० या कालावधीत बंद असेल. मेट्रो कर्मचाऱ्यांना लक्ष्मीपूजनासाठी ही वेळेची सवलत एक दिवसापुरती देण्यात आली आहे. सोमवारपासून (१३ नोव्हेंबर) पुणे मेट्रोची सेवा नेहमीप्रमाणे पहाटे सहा ते रात्री १० वाजेपर्यंत सुरळीत सुरू असणार आहे.