पुणे : मेट्रो प्रवासाचे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना रांगेत उभे राहावयाला लागू नये आणि त्यांच्या वेळेची बचत व्हावी, यासाठी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून तिकीट काढण्याची सुविधा महामेट्रोकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. मेट्रो प्रकल्पाअंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दोन मेट्रो मार्गिकांची कामे सुरू आहेत. यातील काही अंतरावर मेट्रोची प्रवासी सेवा सुरू झाली असून येत्या काही दिवसांत आणखी काही अंतरावर मेट्रोची प्रवासी सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना विनासायास मेट्रो प्रवासाचे तिकीट मिळावे, यासाठी महामेट्रोकडून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मेट्रोने सुरू केलेल्या ९४२०१०१९९० या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप केल्यावर प्रवाशांच्या मोबाइलवरच क्यूआर कोड येईल आणि त्याच्या माध्यमातून मोबाइलवरच तिकीट मिळणार आहे. दोन पद्धतीने प्रवाशांना तिकीट काढता येणार आहे. मेट्रोने प्रत्येक स्थानकात उपलब्ध करून दिलेल्या किऑस्क मशिनच्या सहाय्याने प्रवासी स्वत: हे तिकीट काढू शकतो. तर स्थानकात जाऊन टॉम ऑपरेटरशी संपर्क साधून ई-तिकीट मिळवता येईल. ही सुविधा मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे, अशी माहिती महामेट्रोकडून देण्यात आली. व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटद्वारे तिकिटे मिळण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना सुलभ प्रवास करता येणे शक्य आहे. नवीन तिकीट प्रणालीने प्रवाशांचा वेळ वाचणार असून या सुविधेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी केले आहे.

nala sopara railway station
मराठीचा आग्रह करणाऱ्या प्रवाशाला डांबले, तिकीट तपासनीसाची दमदाटी
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
IAS Whatsapp Group Controversy
IAS Whatsapp Group Controversy : IAS अधिकाऱ्याच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून मोठा गोंधळ; केरळ सरकार करणार चौकशी, तर फोन हॅक झाल्याचा अधिकाऱ्याचा दावा
BEST employees protested for Diwali bonus and other demands
‘बेस्ट’च्या अचानक संपाने प्रवाशांचे हाल; भाऊबीजेला चालकवाहकांचे काम बंद आंदोलन
Loksatta explained What is the secret behind canceling the acquisition of Metro 1
विश्लेषण: ‘मेट्रो १’चे अधिग्रहण रद्द करण्यामागचे नेमके रहस्य काय?
Irctc ticket booking tatkal tickets book without money getting blocked guide
IRCTC Tatkal Booking : पैसे न अडकता कसे काढावे तत्काळ तिकीट? जाणून घ्या योग्य पद्धत
best bus route change due to traffic congestion in dadar for diwali shopping
दादरमध्ये वाहतूक कोंडी; ‘बेस्ट’ मार्गात बदल करण्याची नामुष्की
Chota Matka a tiger from the Tadoba Andhari Tiger Project gave a glimpse to the tourists
ताडोबात ‘सीएम’चा रोड शो, अन् ताफा…

किऑस्क मशिनने कसे काढाल तिकीट?

  • किऑस्क मशिनवर प्रवासाचा मार्ग निवडल्यानंतर तिकिटाचे पैसे देताना कागदी तिकीट किंवा ई-तिकीट यापैकी हवा तो पर्याय निवडावा.
  • ई-तिकीट असा पर्याय निवडल्यावर आलेला स्कॅनर ( दफ कोड) आपल्या मोबाइलद्वारे स्कॅन करावा. स्कॅन केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपवर क्रमांकावर ओटीपी येईल. तो ओटापी किऑस्क मशिनमध्ये टाइप केल्यानंतर मोबाइलवर लिंक उपलब्ध होईल. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर ई-तिकीट दिसेल.