पुणे : शिवाजीनगर न्यायालय स्थानक ते रुबी हॉल स्थानक या दरम्यान सोमवारी पुणे मेट्रोची यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली. यामुळे या मार्गावर एप्रिल महिन्याच्या अखेरीस सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. ही मार्गिका सुरू झाल्यानंतर मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ होण्याचाही अंदाज आहे.

पुणे मेट्रोची शिवाजीनगर स्थानक ते रुबी हॉल स्थानक ही चाचणी सोमवारी दुपारी घेण्यात आली. शिवाजीनगर स्थानकातून मेट्रो ३ वाजून ५० मिनिटांनी निघून ४ वाजून ७ मिनिटांनी रुबी हॉल स्थानकावर पोहोचली. या मेट्रोचा वेग ताशी १० किलोमीटर होता. मुळा-मुठा संगम पूल पार करून मेट्रो मंगळवार पेठ स्थानकात पोहोचली. तेथून मेट्रोने पुणे रेल्वे स्थानक पार करून रुबी हॉल स्थानक नियोजित वेळेत गाठले. मेट्रोने या चाचणीत ठरलेली उद्दिष्टे पार पाडली.

maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
restrictions on sale of railway platform tickets lifted from 9 november
Railway Platform Tickets Available : फलाट तिकीट पुन्हा उपलब्ध
new ott release november
थिएटरमध्ये गाजलेले ‘हे’ सिनेमे OTT वर होणार प्रदर्शित, काही याच वीकेंडला पाहता येणार, वाचा यादी
election day fun facts election day activities voting activities on Election Day
मतदान दिनाच्या गमतीजमती!
apmc premises free from traffic jams due to measures taken by the traffic police
एपीएमसी परिसर वाहतूक कोंडीमुक्त; वाहतूक पोलिसांच्या उपाययोजनांमुळे नागरिकांना दिलासा

पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे महाविद्यालय स्थानक ही १२ किलोमीटरची मार्गिका २०२२ मध्ये प्रवाशांसाठी सुरू झाली. त्यानंतर आता लवकरच फुगेवाडी स्थानक – शिवाजीनगर न्यायालय स्थानक आणि गरवारे महाविद्यालय स्थानक – शिवाजीनगर न्यायालय स्थानक – रुबी हॉल स्थानक या एकूण १२ किलोमीटरच्या मार्गिका लवकरच प्रवाशांसाठी सुरू होणार आहेत.

गरवारे स्थानक ते शिवाजीनगर न्यायालय स्थानक या मार्गिकेवर मेट्रोची चाचणी मागील वर्षी २५ नोव्हेंबरला घेण्यात आली आली होती. त्याचप्रमाणे फुगेवाडी स्थानक ते शिवाजीनगर न्यायालय स्थानक मार्गावर गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला चाचणी घेण्यात आली होती. शिवाजीनगर न्यायाल स्थानक- मंगळवार पेठ – पुणे रेल्वे स्थानक – रुबी हॉल स्थानक या मार्गावर सोमवारी चाचणी घेण्यात आली. या तिन्ही मार्गिकेवरील कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत. उर्वरित कामे येत्या आठ ते दहा दिवसांत पूर्ण झाल्यावर या मार्गिकांचे निरीक्षण करण्यासाठी रेलवे सुरक्षा आयुक्तांना बोलावण्यात येणार आहे. त्यांची मान्यता मिळाल्यानंतर प्रवासी सेवा या मार्गावर सुरू करण्यात येईल. ही सेवा एप्रिल महिन्याच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे.

शिवाजीनगर न्यायालय स्थानक ते रुबी हॉल स्थानक या मार्गिकेवर मंगळवार पेठ (आरटीओ), पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल स्थानक ही महत्त्वाची स्थानके आहेत. यामुळे आरटीओ कार्यालय, पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल, जहांगीर हॉस्पिटल, वाडिया महाविद्यालय ही ठिकाणी जोडली जाणार आहेत.

मेट्रो स्थानकातून थेट रेल्वे स्थानकात

पुणे रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाला मेट्रोच्या कॉनकोर्स मजल्याशी जोडण्यात आल्यामुळे रेल्वे आणि मेट्रो प्रवाशांना थेट एकमेकांच्या सेवांचा लाभ घेता येणार आहे. मेट्रो स्थानकावरून रेल्वेच्या सर्व फलाटांवर जाणे शक्य होणार आहे.

मेट्रोची आजची चाचणी नियोजित उद्दिष्टानुसार पार पडली. लवकरच पुणे रेल्वे स्थानक, प्रादेशिक परिवहन कार्यालय व रुबी हॉल मेट्रोद्वारे जोडले जाईल.

– डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो