लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : कसबा पेठेतील साततोटी चौकात भुयारी मेट्रो स्थानकाचे काम करणाऱ्या कामगारांना धमकावून त्यांच्याकडील २० हजारांची रोकड लुटण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत वाजिद वाहिद खान (वय २७, रा. लेबर कॅम्प, मुंढवा) याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खान, त्याचे सहकारी मित्र अमोल गुजर, जनार्दन यादव पवळे चौकातील उपाहारगृहात चहा प्यायला गेले होते. तेथून ते साततोटी चौकातील भुयारी मेट्रो स्थानकाकडे निघाले होते. त्यावेळी रस्त्यात एकाने त्यांना धक्का दिला. त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. तेथून जाणारी रिक्षा थांबवून तिघांना पवळे चौकाकडे नेले. चोरटा आणि साथीदाराने त्यांना चाकूचा धाक दाखविला.

आणखी वाचा-पुणे : स्वच्छ एटीएम केंद्र कचऱ्यात! बंद पडलेल्या केंद्रांना मुदतवाढ देण्याचा महापालिकेचा घाट

तेथील एका दुकानात खान, गुजर, यादव यांना नेले. धमकावून ऑनलाइन पद्धतीने २० हजार ३०० रुपये दुकानदाराकडे जमा करण्यास सांगितले. दुकानदाराकडून २० हजार ३०० रुपयांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक मांजरे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metro workers were beaten up and robbed cash in kasba peth pune print news rbk 25 mrj