पुणे : म्हाडा पुणे मंडळाच्या वतीने ४८५० सदनिकांसाठी संगणकीय सोडत राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (दूरदृश्य प्रणालीद्वारे) यांच्या हस्ते काढण्यात आली. पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), पुणे मंडळाने नेमलेले देखरेख समितीचे सदस्य प्रमोद यादव, दीपक नलावडे, धनंजय कुलकर्णी, पुणे मंडळाचे मुख्याधिकारी अशोक पाटील या वेळी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या वेळी बोलताना गृहनिर्माण मंत्री सावे म्हणाले, ‘म्हाडाच्या माध्यमातून राज्याच्या विविध भागात अनेक सदनिका उभारण्यात आल्या आहेत. म्हाडाची सोडत संपूर्ण संगणकीय प्रणालीवर आधारीत असून यात मानवी हस्तक्षेप होत नाही. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविली जात आहे. म्हाडाच्या संगणकीय सोडतीला नागरिकांचा मिळणारा प्रतिसादावरून राज्यात परवडणाऱ्या दरातील घरांची गरज आणि मागणी दिसून येत आहे. या सोडतीत घर न मिळालेल्यांसाठी लवकरच पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाकडून (म्हाडा) लवकरच दुसरी सोडत काढण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी गुरुवारी केली.

हेही वाचा…शेअर दलालाचे एक कोटींच्या खंडणीसाठी अपहरण, दलालाची अमरावतीतून सुटका; तिघे गजाआड

सोडतीत नाव आलेल्या नागरिकांचा जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोडतीचा निकाल https://mhada.gov.in आणि https://lottery.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळांवर तसेच पुणे मंडळाच्या कार्यालयातदेखील दर्शविण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhada pune board conducts computerized lottery for 4850 flats announces upcoming draw pune print news psg 17 psg