पुणे : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये होणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य समाइक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केले आहे. त्यानंतर आता अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या एमएचटी-सीईटीचीविद्यार्थी नोंदणीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> आरटीईअंतर्गत शाळा नोंदणी सुरू… विद्यार्थी नोंदणी कधीपासून?

सीईटी सेलकडून पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या एकूण १९ प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. त्यासाठीचे संभाव्य वेळापत्रक सीईटी सेलने उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार सीईटी परीक्षा मार्चपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांसाठीची  नोंदणी प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी, शिक्षणशास्त्र-शारीरिक शिक्षणशास्त्र पदव्युत्तर पदवी (एमएड आणि एमपीएड), तीन वर्षे विधी अभ्याससक्रम अशा काही अभ्यासक्रमांच्या सीईटीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> महाराष्ट्राची इच्छा आहे त्याप्रमाणे ते करतील : आमदार चेतन तुपे

सीईटी सेलच्या नियोजानुसार अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, कृषि पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची एमएचटी-सीईटी ९ ते २७ एप्रिल या कालावधीत घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठीची ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ३० डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. अधिक माहिती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.