पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे या कोंडीबाबत सातत्याने आयटीयन्स तक्रार करीत असतात. आता ही कोंडी सोडविण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) आयटी पार्कमधील पर्यायी रस्त्यांसह उड्डाणपुलाचे सुमारे ६५० कोटी रुपयांचे काम हाती घेतले आहे. यामुळे भविष्यात आयटी पार्कमधील प्रवास जलद होण्यास मदत होणार आहे.

हिंजवडी आयटी पार्कमध्ये सध्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यातील काही प्रकल्पांना एमआयडीसीने गती दिली आहे. हिंजवडीतील लक्ष्मी चौकात वारंवार वाहतूक कोंडी होती. ही कोंडी सोडविण्यासाठी या चौकात उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हा पूल चारपदरी आणि ७२० मीटर लांबीचा असेल. त्यासाठी ४० कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. या पुलासाठीच्या निविदा मागविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच या पुलाचे काम सुरू होणार आहे, अशी माहिती एमआयडीसीतील सूत्रांनी दिली.

mumbai pune express way link road at lonavala
Pune-Mumbai Express Way: पुणे ते मुंबई अंतर अर्ध्या तासाने कमी होणार, ‘या’ रस्त्याचं काम ९० टक्के पूर्ण; नवी मुंबई विमानतळ आणखी वेगात गाठता येणार!
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Satara District Collector Jitendra Dudi has been posted as Pune District Collector pune news
एकाच कुटुंबातील तीन अधिकारी पुण्याचा कार्यभार सांभाळणार; जितेंद्र डुडी पुण्याचे नवीन जिल्हाधिकारी
Pimpri-Chinchwad Police Commissionerate area to be expanded soon
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लवकरच वाढ; ‘या’ पोलिस ठाण्याचा होणार समावेश
china leftover men reason
‘या’ देशात लग्नासाठी मुलांना मुलीच मिळेनात; ३.५ कोटी मुलांवर एकटे राहण्याची वेळ? कारण काय?
Maharashtra assembly elections 2024
इडीने छळले. सत्तेशी जुळले, धन फळफळले
History of ikat
History of Ikat: इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये भारतीय कापड; काय सांगते इकतची प्राचीन परंपरा?
Vasai alarm ATM center, alarm ATM, Vasai,
एटीएम केंद्रातील अलार्मचा ५ तास नागरिकांना मनस्ताप

आणखी वाचा-एकाच कुटुंबातील तीन अधिकारी पुण्याचा कार्यभार सांभाळणार; जितेंद्र डुडी पुण्याचे नवीन जिल्हाधिकारी

हिंजवडीतील शिवाजी चौक ते स्मशानभूमी या रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. हा रस्ता ९०० मीटर लांबीचा आहे. हा रस्ता सहापदरी केला जाणार आहे. यासाठी २४.७४ कोटी रुपये खर्च येणार आहे. याचबरोबर आयटी पार्कमधील टप्पा एकपासून टप्पा तीनला जोडणारा नवीन रस्ता बांधला जाणार आहे. हा रस्ता ५ किलोमीटर लांबीचा असेल आणि त्यासाठी ५८४.१४ कोटी रुपये खर्च येईल. या दोन्ही रस्त्यांच्या जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहेत. याचबरोबर काही भूसंपादन करावे लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग ही जागा संपादित करून एमआयडीसीला देणार आहे. त्यानंतर या दोन्ही रस्त्यांची कामे सुरू होतील, असे सूत्रांनी सांगितले.

बाणेरला थेट आयटी पार्कशी जोडणाऱ्या रस्त्याचे काम सुरू आहे. हा रस्ता सहापदरी असून, एकूण ५.७५ किलोमीटर लांबीचा आहे. यातील २.५ किलोमीटर रस्त्याचे काम झाले असून, उरलेले ३.२५ किलोमीटरचे काम पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) नगररचा योजनेला (टीपी स्कीम) मंजुरी मिळाल्यानंतर सुरू होईल. तसेच, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आयटी पार्कमध्ये ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. त्यातील २८० कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे, असेही सूत्रांनी नमूद केले.

आणखी वाचा-पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लवकरच वाढ; ‘या’ पोलिस ठाण्याचा होणार समावेश

आयटी पार्कमधील प्रकल्प

लक्ष्मी चौकातील उड्डाणपूल

लांबी – ७२० मीटर
खर्च – ४० कोटी रुपये

शिवाजी चौक ते स्मशानभूमी रस्ता रुंदीकरण

लांबी – ९०० मीटर
खर्च २४.७४ कोटी रुपये

सीसीटीव्ही यंत्रणा

एकूण कॅमेरे – ३००
बसविलेले कॅमेरे – २८०

राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील कोंडी सोडविण्यासाठी विविध पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार एमआयडीसीकडून पावले उचलण्यात येत आहेत. भविष्यात येथील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याच्या दिशेने आम्ही काम करीत आहोत. -नितीन वानखेडे, मुख्य अभियंता, एमआयडीसी

Story img Loader