दिल्ली येथे २८ वर्षीय श्रद्धाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याच्या घटनेमुळे राज्यभरात विविध संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहे. त्या घटनेच्या निषेधार्थ आज पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थी संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. त्यावेळी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे सहभागी झाले होते.

हेही वाचा- पिंपरीः राहुल गांधींच्या कौतुकामुळे कुमार केतकरांच्या भाषणात अडथळे

principal suspended for negligence in duty in midday meal food poisoning case pmd
वर्धा : कर्तव्यात कसुर; मुख्याध्यापक निलंबित; शालेय पोषण आहार विषबाधा प्रकरण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
allahabad highcourt
“हे हिंदुस्थान आहे, बहुसंख्याकांच्या इच्छेनुसारच देश चालणार”, न्यायाधीशांच्या वक्तव्याची चर्चा!
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
mla satyajeet tambe writes letter to maharashtra cm devendra fadnavis for bangladesh hindu protection
बांगलादेश मधील हिंदूंचे रक्षण करा; आमदार सत्यजित तांबे यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

सध्या वातावरण फार खराब असून या काही गोष्टी एका दिवसात घडलेल्या नाहीत.या गोष्टीला कोणाची तरी उदासीनता आणि उदारमतवाद कारणीभूत आहे. प्रत्येकाने आपापली विचारसरणी तपासून घ्यावी.अशी गांभीर परिस्थिती निर्माण झाली असून आपला देश वाचवयाचा आहे.आपल्या देशातील माता भगिनी सुरक्षित ठेवायच्या आहेत.तसेच मानवतेच्या विरोधात असलेले जे घटक आहेत.त्याबद्दल आपण सावधगिरीची पाऊल उचलली पाहिजे. तसेच संस्कार हे फार महत्त्वाचे असून याकरीता पालक आणि शिक्षकांनी जागरूक राहिले अशी भूमिका एकबोटे यांनी यावेळी मांडली.

हेही वाचा- ठाकरे गटाला धक्का; शर्मिला येवलेसह युवती सेनेच्या ३६ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

तसेच ते पुढे म्हणाले की, शिंदे फडणवीस सरकारकडून मला एक अपेक्षा होती.ज्या प्रकारे अफजल खानाच्या थडग उचकटून काढल. त्याप्रमाणे लव जिहाद बाबत कायदा होईल.परंतु ती अपेक्षा अद्याप ही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे लव जिहाद विरुद्ध आणि मानवतेच्या मूल्यांना काळिमा फासणारे जे घटक आहेत.त्याची दखल घेऊन, एक चांगला कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा.अशी मागणी राज्याच्या जनतेच्या वतीने मी राज्य सरकारकडे करीत आहे. मात्र सर्व गोष्टी कायद्याने घडणार नाही.त्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे.कोणीही प्रेमाच्या खोट्या जाळयात फसू नये.हिंदू धर्माच्या लोकांनी हिंदू धर्माचा अभिमान बाळगण्याची गरज आहे. तसेच लव जिहाद विरोधात राज्य सरकारने कायदा करावा, यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले. मस्तानीला धर्म पत्नी करणाऱ्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा आदर्श ठेवून हिंदू धर्म वाढवा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

हेही वाचा- एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सत्ता बदलण्यात एक्सपर्ट; रामदास आठवले

छत्रपती शिवाजी महाराज हे पुढील पाच हजार वर्षासाठी आदर्शच

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श आहेत. तसेच नितीन गडकरी आणि शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे. त्यावर मिलिंद एकबोटे म्हणाले की, मी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावर बोलणार नाही.पण छत्रपती शिवाजी महाराज हे पुढील पाच हजार वर्षासाठी आदर्शच असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेसोबत चर्चा केली पाहिजे

उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाच्या मुद्यापासून दूर केल्याची टीका होत आहे.त्यावर मिलिंद एकबोटे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाच्या मुद्यापासून दूर गेलेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी ताबडतोब भूमिका बदलून एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा केली पाहिजे.हिंदुत्वाच्या व्यापक दृष्टिकोनातून पुन्हा शिवसेना एक झाली पाहिजे.अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

Story img Loader