पुणे : भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये ‘वंदे मारतम‘ला महत्त्वाचे स्थान आहे. वंदेमातरमच्या संगीत रचनाही वैशिष्टपूर्ण आहेत. त्याबरोबरीनेच मराठी संगीतकर्मींनी राजकीय नेतृत्वाशी दिलेल्या अभूतपूर्व अशा सांगीतिक लढ्यामुळेच वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला, असे मत वंदे मातरमचे अभ्यासक मिलिंद सबनीस यांनी व्यक्त केले.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्वरमयी गुरुकुल आयोजित ‘मराठी संगीतकर्मी आणि वन्दे मातरम् या कार्यक्रमात मिलिंद सबनीस यांचे व्याख्यान झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे, स्वरमयी गुरुकुलचे कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे, डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशनच्या सचिव डॉ. भारती एमडी या वेळी उपस्थित होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सबनीस म्हणाले, सरकारी मान्यता असलेले वंदे मातरमचे संगीत पं. वि. रा. आठवले या मराठी संगीतकर्मींनी दिले आहे. पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, मा. क़ृष्णराव फुलंब्रीकर, पं. वि..रा. आठवले यांनी दिलेले योगदान स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असतानाही दुर्लक्षित राहिले आहे. गानहिरा हिराबाई बडोदेकर यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी आकाशवाणीवरून गायलेल्या वंदे मातरमने कार्यक्रमास प्रारंभ झाला.

हेही वाचा : विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी शाळेची बस आंबेगाव येथे दरीत कोसळली, ४ विद्यार्थी जखमी

विष्णुपंत पागनीस, पं. विनायकबुवा पटवर्धन, पं. भीमसेन जोशी, सावळारामबुवा शेजवळ, केशवराव भोळे, मास्तर कृष्णराव, गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर, वीणा सहस्रबुद्धे, पं. राम मराठे, स्वरराज छोटा गंधर्व, वसंत देसाई, पं. दिनकर कैकिणी अशा दिग्गजांपासून आजच्या अजय-अतुल, प्रदीप वैद्य ते वंदे मातरमच्या समूहगायनाचा विश्वविक्रम करणाऱ्या अजय पराड यांच्या दुर्मीळ ध्वनिमुद्रिका तसेच चित्रफितींचे सबनीस यांनी सादरीकरण केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Milind sabnis said vande mataram got status national anthem the musical struggle marathi musicians pune print news tmb 01