बोपखेलमधील रामनगर, गणेशनगरच्या नागरिकांना होणारा अटकाव व दापोडीतून बोपखेल मार्गावर सातत्याने होणारा जाच यामुळे कंटाळलेल्या ग्रामस्थांनी गुरूवारी खासदार गजानन बाबर यांच्या नेतृत्वाखाली प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. बाबर यांनी चर्चा केल्यानंतर काही प्रमाणात सौम्य भूमिका घेण्याची तयारी लष्करी अधिकाऱ्यांनी दर्शवल्याचे सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून दापोडीतून बोपखेलमध्ये जाणाऱ्या रस्त्यावर लष्कराने कडक तपासणी सुरू केली आहे. बोपखेलशिवाय अन्य भागातील नागरिकांना विशेषत: रामनगर, गणेशनगरच्या नागरिकांना प्रवेश देताना अटकाव करण्यात येत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीला मान्यता दिली जात नव्हती. स्थानिक नागरिकांना ओळखपत्रांची सक्ती होत होती. अलीकडे, हेल्मेटची सक्ती करण्यात आली. या सर्व प्रकारास ग्रामस्थ कंटाळले होते. स्थानिक नगरसेवक संजय काटे यांनी गेल्या काही दिवसांपासून लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदारांना कल्पना दिली, तेव्हा त्यांच्या नेतृत्वाखाली दापोडीत सीएमई प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्यात आले. खासदारांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नगरसेवक संजय काटे, शहरप्रमुख योगेश बाबर, रोमी संधू, मंगल घुले, सुनील ओव्हाळ, तुषार नवले, राजू घुले, शशिकांत घुले, मेहबूब शेख, भाग्यदेव घुले, लिओनार्ड वाझ उपस्थित होते. बाबर म्हणाले, महिला, ज्येष्ठ व आजारी नागरिकांवर सक्ती करू नये. लग्न व अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होता कामा नये आदी मागण्या केल्या आहेत. जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्याकडे तक्रार केली असून ते प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Dec 2013 रोजी प्रकाशित
लष्करी त्रासाला कंटाळलेल्या ग्रामस्थांसाठी बाबर यांचे आंदोलन
बोपखेलमधील रामनगर, गणेशनगरच्या नागरिकांना होणारा अटकाव व दापोडीतून बोपखेल मार्गावर सातत्याने होणारा जाच यामुळे कंटाळलेल्या ग्रामस्थांनी गुरूवारी खासदार गजानन बाबर यांच्या नेतृत्वाखाली प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 23-12-2013 at 02:42 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Military disturbance villagers agitation gajanan babar pimpri pune