लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: लष्करातील जवानाला मारहाण करुन लुटल्याची घटना घोरपडीतील सोपानबाग परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Satara , Mother, conspired, boyfriend, murder,
सातारा : आईने प्रियकरासोबत मुलाच्या हत्येचा रचलेला कट उधळला
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Pune Municipal Corporation contract employee stabbed to death over immoral relationship in Kothrud
कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात
Amravati , Murder , immoral relationship,
अमरावती : अनैतिक संबंधातून हत्‍या, अपघाताचा बनाव
property tax defaulters in pune news in marathi
अभय योजनेचा फायदा घेणारेच झाले पुन्हा थकबाकीदार, नक्की प्रकार काय ?
chaturang article on revolutionary tone of Indian womens liberation
भारतीय स्त्रीमुक्तीचा क्रांतिकारी सूर
bombay HC slaps Rs 1 lakh cost on ED for case on realtor
विकासकावर खोटा खटला; पुराव्यंशिवाय कारवाई, न्यायालयाचे ताशेरे
Knife stab in stomach on busy road in Bhiwandi thane news
भिवंडीत भररस्त्यात पोटात भोसकला चाकू; हल्ल्यानंतर जखमीला शिवीगाळ केल्याची विकृती मोबाईल चित्रीकरणात कैद, एकाला अटक

याबाबत परशुराम बसप्पा नगराळे (वय ३९) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नगराळे हे आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटमध्ये चालक आहेत. ते घोरपडीतील सोपानबाग परिसरातून सायकलवरुन निघाले होते. त्या वेळी चोरट्यांनी सुरक्षारक्षक मोहित साकेत याला अडवून मारहाण करण्यास सुरुवात केली. चोरट्यांनी साकेतला धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला. नगराळे यांनी लूटमारीचा प्रकार पाहिला आणि चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी नगराळे यांना दगड फेकून मारला. त्यांना चाकूचा धाक दाखवला. नगराळे यांच्याकडील मोबाइल संच हिसकावून घेतला.

आणखी वाचा-पुणे: नवले पुलावर पुन्हा अपघात; अवजड कंटेनर उलटला

सुरक्षारक्षक साकेत याला धमकावून चोरट्यांनी त्याच्याकडील मोबाइल संच हिसकावून घेतला. चोरट्यांनी दोन मोबाइल संच, रोकड असा १७ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. पोलीस उपनिरीक्षक शितोळे तपास करत आहेत.

Story img Loader