मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवर अमृतांजन पुलाजवळ दुधाच्या टँकरचा भीषण अपघात झाला असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. दुधाचा टँकर कर्नाटक येथून मुंबईला जात असताना हा अपघात झाला.

कर्नाटकमधील दुधाचा टँकर मंगळवारी दुपारी मुंबईच्या दिशेने जात होता. एक्स्प्रेस वेवर अमृतांजन पुलाजवळ चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि टँकरने पुलाच्या खांबाला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की चालकाच्या कॅबिनचा चक्काचूर झाला. या अपघातात चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून अपघातानंतर टँकरमधील दूध रस्त्यावर सांडले आहे. या अपघाताचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही.