पिंपरी- चिंचवड आणि पुणे परिसरामध्ये ड्रग्सच प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तरुण मुलं याच्या आहारी जात आहेत. यावर आळा घालण्याचं आवाहन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पोलिसांसह नागरिक उपस्थितीत होते. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे हे दोन वर्ष इथेच राहतील तुम्ही काळजी करू नका. असा चिमटा उपस्थित पोलीस पदाधिकाऱ्यांना काढला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, सर्वांना शांत झोप यावी म्हणून पोलीस रात्र- दिवस काम करत असतात. पिंपरी- चिंचवड आणि पुणे परिसरात ड्रग्सच प्रमाण खूप वाढत चालल आहे. हे तरुण मुलांना वेगळ्या वळणावर लावत आहे. हे आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी ‘आऊट ऑफ वे जावे’ असं आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पुढे ते म्हणाले, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराप्रकरणी दामिनी पथक हे खूप स्ट्रॉंग करा, असे फटके द्या की दहशत निर्माण झाली पाहिजे. ताकद इतकी वापरायची की त्याच्या भीतीनेच प्रश्न संपले पाहिजेत अशी पालकमंत्री म्हणाले.