पुणे: मुंबईत २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचा हा धडा शालेय व महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकात घेतला जाईल, असे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना तसेच त्यात बळी पडलेल्या निरपराध नागरिकांना पोलीस मित्र संघटनेच्या वतीने झाशीची राणी पुतळ्याजवळ श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्या प्रसंगी पाटील बोलत होते.
संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, अरुण जाधव, मुरलीधर करपे, संदीप खर्डेकर यांच्यासह दामिनी पथकांनी मेणबत्या पेटवून श्रद्धांजली अर्पण केली. अतिरेकी कसाबला जिवंत पकडताना त्याच्या गाडीत असलेले व कसाबच्या गोळ्यांनी जखमी झालेले सहायक पोलीस निरीक्षक अरुण जाधव यांचा पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.