पुणे : राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वडगाव मावळ येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. “राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यंदा सगळे सण आणि उत्सव जल्लोषात आणि कोणत्याही निर्बंधांशिवाय साजरे केले जातील अशी घोषणा केलेली आहे. दसरा मेळाव्यावरून त्यांनी त्यांच्या पक्षाची चिंता करावी, आम्ही आमच्या पक्षाची चिंता करू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

“राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यंदा सगळे सण आणि उत्सव जल्लोषात आणि कोणत्याही निर्बंधांशिवाय साजरे केले जातील अशी घोषणा केलेली आहे. त्या प्रमाणेच गणेशोत्सव आणि दहीहंडी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्विघ्नपणे पार पडलेत. आता नवरात्र आणि दिवाळी देखील सुरळीत पार पडेल. मात्र गणेशोत्वात थोडा अतिरेक पाहायला मिळाला . जर आपण अतिरेक टाळला तर आनंदाने सण साजरे करता येतात. अतिरेक झाला तर निर्बंध येण्याची शक्यता असते” असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : पुणे ‘रिंग रोडचे भवितव्य खासगी जागा मालकांच्या हातात; एकूण १७४० हेक्टरपैकी १६०१ हेक्टर खासगी जागा

छगन भुजबळ आणि खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, राजकारण्यांनी कोणतेही विधाने करत असताना ती विचारपूर्वकच करायला हवीत . कारण राजकीय नेते हे समाजाला दिशा दखविण्याचे काम करतात. शेवटी लोकशाहीत आवाहन करणे इतकेच आपल्या हातात असते , कारण लोकशाहीने अधिकारच इतके दिलेले आहेत की समोरचा म्हणेल तू कोण सांगणारा? पण हे नक्की आहे की असे व्यक्त होण्यावर मर्यादा असायला हव्यात. जर तुम्हाला पटत नसेल तर त्यांनी ते अमलात आणू नये.

हेही वाचा : उड्डाणपूल पाडण्यापूर्वीच स्थानिकांत संभ्रमांचे ‘स्फोट’; चांदणी चौकाजवळच्या रहिवाशांना कोणत्याही सूचना नाहीत

शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवरील हल्ला व त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी केलेली शिवीगाळ यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. “मला माहिती नसलेल्या विषयावर मी बोलत नाही. पण राज्य प्रशासन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याची दखल घेतील. मात्र मी माध्यमांना आवाहन करू इच्छितो की तुम्ही कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधी नाही. त्यामुळे जे घडते ते तुम्ही दाखवायला हवे”.

Story img Loader