“युक्रेनमध्ये सध्या जी परिस्थिती आहे. त्या परिस्थितीत आपले जे किव्हमध्ये मिशन सुरू आहे, ते प्रत्येकवेळी जेव्हा तिथली परिस्थिती बदलत आहे. त्या पार्श्वभूमीवर तिथे असलेल्या भारतीय नागरिकांसाठी अॅडव्हाझरी काढली जाते. काल आम्ही मागील जवळपास चार-पाच दिवसांपासून किव्ह येथे जे भारतीय विद्यार्थी होते त्यांना आम्ही अॅडव्हाझरीच्या माध्यमातून सल्ला दिला होता. किव्ह सोडणंच उचित ठरेल. युक्रेनच्या पश्चिम भागाकडे त्यांनी गेलं पाहिजे.” असं परराष्ट्र व्यवहार आणि संसदीय कार्य राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी आज(बुधवार) पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं.

तसेच, “याचप्रकारे खार्कीव्ह येथील जी ताजी माहिती आम्हाला प्राप्त होत आहे, त्या आधारावर वेळोवेळी अॅडव्हायझरी दिली जाते. खार्कीव्ह, सूमी या पूर्व भागात अजूनही ७ हजार विद्यार्थी अडकलेले आहेत. खार्कीव्ह सोडण्यासाठी आता सूचना दिल्या आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, आम्ही विद्यार्थ्यांना आणायला उशीर केलाय हे म्हणणं योग्य नाही.कारण अशा परिस्थितीत मदत करायला नियोजन करावं लागतं.” असं देखील व्ही. मुरलीधरन यांनी यावेळी बोलून दाखवलं.

Devendra Fadnavis,
“…तर मतांचे धर्मयुद्ध आपल्यालाही लढावं लागेल”; सज्जाद नोमानींच्या व्हिडीओवरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल!
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
rbi governor shaktikanta das on inflation risks and slowing growth
चलनवाढीसह विकासवेग मंदावण्याचा धोका ; शक्तिकांत दास
Uddhav Thackeray criticized Eknath Shinde
“माझी बॅग तुझ्याकडे देतो, फक्त त्यातले कपडे…”; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं!
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”

Russia Ukraine War News Live Updates: युक्रेनमध्ये दुसऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू, भारतीय दुतावासाच्या खार्किव्ह सोडण्याच्या सूचना

युक्रेनच्या खार्कीव्ह आणि अन्य युद्धग्रस्त शहरांतून भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्याबाबत रशिया आणि युक्रेनच्या दूतावासाबरोबरच उभय देशांतील भारतीय दूतावासांशी संपर्कात आहेत. युद्धग्रस्त भागांतून भारतीयांना सुरक्षित बाहेर पडू देण्याबाबत २४ फेब्रुवारीपासून या दोन्ही देशांकडे वारंवार मागणी करण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.‘ऑपरेशन गंगा’अंतर्गत भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यात समन्वय साधण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीप पुरी हे हंगेरी, ज्योतिरादित्य शिंदे हे रोमानिया, किरेन रिजीजू हे स्लोव्हाकीया आणि जनरल व्ही़ क़े सिंह यांना पोलंडमध्ये पाठविण्यात आले आहे.