पुणे : भारतीय जनता पक्षाच्या महासंपर्क अभियानाच्या निमित्ताने दक्षिण भारतीय आणि विशेषतः पुण्यातील केरळी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन शनिवारी पुण्यात येणार आहेत. औंध येथील पंडित भीमसेन जोशी सभागृहात सायंकाळी हा स्नेहमीलनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कार्यक्रमास पुण्याचे पालकमंत्री, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, धीरजी घाटे उपस्थित राहणार आहेत. समाजाच्या विविध घटकांशी संवाद साधण्याच्या या अभियानात दक्षिण भारतीय नागरिकांशी ते यानिमित्ताने संवाद साधतील. पुण्यात विविध क्षेत्रांत दक्षिण भारतीय अग्रेसर असून त्यांच्याशी यानिमित्ताने संपर्क अभियान राबवले जात आहे. या निमित्ताने मुरलीधरन खासदार निधीतून पुण्यातील दक्षिण भारतीय संस्थांना आर्थिक सहाय्य देणार आहेत. नवीन शिक्षण धोरण शिक्षणात मूलगामी बदल करणाऱ्याचे असून त्यासाठी शाळांनी चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत, या हेतूने पुण्यातल्या निवडक शाळांना आपल्या खासदार निधीतून ते सहकार्य करणार आहेत. हा निधी या कार्यक्रमात शाळांना सुपूर्द केला जाईल.

हेही वाचा – राज्य सरकारने वर्षभरात पुण्याला काय दिले? घोषणांचा सुकाळ, अंमलबजावणीचा दुष्काळ!

या निमित्ताने होणाऱ्या संवाद कार्यक्रमात दक्षिण भारतीय पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे आणि दक्षिण भारतीय आघाडीचे पुण्याचे अध्यक्ष मनोज पिल्ले यांनी केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister of state for external affairs v muralitharan will interact with kerala citizens in pune tomorrow pune print news apk 13 ssb
Show comments