कसबा विधानसभा मतदार संघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांच २२ डिसेंबर रोजी निधन झाल.त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे पशू संवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांची केसरीवाडा येथील निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले.त्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत बोलताना मुक्ता टिळक यांच्या सभागृहातील कामकाजातील आठवणींना यावेळी त्यांनी उजाळा दिला.
विधान परिषदेचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नगर जिल्हयाच नामांतर करण्याची मागणी केली.त्या प्रश्नावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,नामांतराचा अंतिम निर्णय अद्यापपर्यंत झाला नाही.आपण सर्वांनी औरंगाबादला संभाजीनगर नाव देण्याची चर्चा ऐकली होती. पण नामांतर करण्यापेक्षा जिल्ह्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याची विशेष गरज आहे.आपण जिल्ह्याच्या विभाजनाची विनाकारण चर्चा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>> भाजप, काँग्रेसमध्ये पुण्यात अंतर्गत धुसफुस
तसेच ते पुढे म्हणाले की, राज्यातील अनेक जिल्हे मोठे आहेत.नाशिक, पुणे या जिल्ह्यांच्या विभाजनाची चर्चा सुरू आहे.त्यामधून आपण काय साध्य करतोय असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
तसेच ते पुढे म्हणाले की, ठाणे जिल्ह्या बाबत सांगायच झाल्यास तेथील भौगोलिक परिस्थिती वेगळी होती.त्यामध्ये आदिवासी विभाग होता.त्याच आपण पालघर जिल्ह्यात विभाजन केल,सातपेक्षा अधिक महापालिका एकाच जिल्ह्यात आहे. मात्र तशी परिस्थिती नगर जिल्ह्याची नसल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>> पुणेकरांचे १९३ कोटी ‘खड्ड्यात’? महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा निधी वापरून रस्ते दुरुस्तीचा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे सतत नगर जिल्ह्याच्या नामांतर आणि विभाजनाबाबत विधान करीत आहे. त्यावर ते म्हणाले की, आमची तिच अपेक्षा आहे की, बाहेरील कोणी येऊन त्यावर भाष्य करण्यापेक्षा जिल्ह्यातील लोकांच्या काय भावना आहेत. असे सांगत गोपीचंद पडळकर यांना टोला लगावत पुढे म्हणाले की,नामांतराच्या विभाजन मुद्यावरुन मतभिन्नता आणि मतभेद तयार होतात.त्यामुळे आज जिल्हय़ाच्या विकासात्मक दृष्टीने सर्वानी एकत्रित येऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे माझ या गोष्टीला समर्थन नसल्याची भूमिका त्यांनी मांडली. तसेच ते पुढे म्हणाले की, पडळकर हे माझे चांगले मित्र असून त्यांना समज देण्याची आवश्यकता नाही.त्याबाबत त्यांच्याशी चर्चा करणार आहे.तसेच असे मुद्दे समोर आल्यावर त्याला वेगळे वळण लागते.त्यामुळे पक्षातील सर्वजण एकत्रित बसून योग्य मार्ग काढू अशी भूमिका त्यांनी मांडली.