पुणे : राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शिवसेनेचे बंडखोर आमदार शंभूराज देसाई यांनी आज पुण्यात उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देखील दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरे करण्यापेक्षा प्रशासकीय कामात लक्ष द्यावे असा सल्ला शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता . त्यावर ते म्हणाले की, प्रशासकीय काम कुठेही थांबलेले नाही. मंत्रिमंडळाच्या नियमित बैठका होत आहे. मंत्री देखील नियमितपणे काम करीत आहे. माननीय मुख्यमंत्री हे कुठे ही मौजमजा करण्यास फिरत नाही. राज्यातील जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी ते फिरत आहेत. राज्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्या करीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली येथे दोन दिवसापासून आहेत. राज्यातील प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा