पुणे : शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई हे पुण्यात आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे देखील दिली. महापुरुषांबद्दल भाजपमधील नेते सतत वादग्रस्त विधान करीत आहेत. त्या विधानाच्या निषेधार्थ काल मुंबईत महाविकास आघाडीतर्फे हा मोर्चा काढण्यात आला. त्यावर देसाई म्हणाले की, मुंबई ही मराठी भाषिकांची, मराठी माणसांची असून मुंबईत २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती. पण कालच्या मोर्चात शिवसेनेचे भगवे झेंडे कमी आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचे अधिक झेंडे दिसत होते. कालच्या मोर्चात ठाकरे गटाचा भगवा दिसलाच नसल्याचे सांगत ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी टीका केली.

वारकरी संप्रदायाबद्दल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यावरून वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. त्यावर ते म्हणाले की, वारकरी भाविकांच्या मनाला ठेच पोहोचविण्याच काम सुषमा अंधारे यांनी केले आहे. एवढ्या गंभीर विषयावर उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती. मात्र त्यांनी काही केले नाही. काल झालेल्या मोर्चात उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सुषमा अंधारे यांनी केलेल्या विधानाबद्दल दिलगिरी या एका शब्दाचा उल्लेख देखील झाला नाही. उद्धव ठाकरे हे पूर्वी वारकरी संप्रदायाबद्दल जो आपलेपणा, प्रेम दाखवित होते ते किती वरकरणी होती हे आताच्या कृतीमधून दिसून येत आहे.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “…अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरणार”, आदित्य ठाकरेंचा इशारा; मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावरही टीका
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Raj Thackeray should come to Sangamner to see why Balasaheb Thorat was defeated says MLA Amol Khatal
माजी मंत्री थोरात यांचा पराभव का झाला ते पाहण्यासाठी राज ठाकरेंनी संगमनेरात यावे – आमदार अमोल खताळ
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
Sanjay Raut on bmc elections
Sanjay Raut : मुंबई पालिकेत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, इतर शहरांचं काय? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Aaditya Thackeray alleged Sanjay Gupta
Aaditya Thackeray : “हे लज्जास्पद आहे”, शिवसेनेच्या तोतया प्रवक्त्यावर संतापले आदित्य ठाकरे; करणार कायदेशीर कारवाई
उद्धव ठाकरेंची स्वबळाची भूमिका टोकाची नाही : शरद पवार

हेही वाचा: पिंपरी- चिंचवडमध्ये लव्ह जिहाद विरोधात हिंदू समाज आक्रमक; विविध मागण्यांसाठी काढला विराट मोर्चा

उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर कारवाई केली पाहिजे. अन्यथा भविष्यात वारकरी संप्रदायाचा फटका उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला निश्चित बसेल. सीमा प्रश्नावरून मोठ्या प्रमाणावर राजकारण पाहण्यास मिळत आहे.त्यावर म्हणाले की, मागील ५० वर्षांपासून सीमावादाचा प्रश्न प्रलंबित होता. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. त्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली असून त्यासाठी एक समिती देखील नेमली आहे.

हेही वाचा: ‘ले. कर्नल पुरोहित ‘द मॅन बेटरेड’ पुस्तक प्रकाशनास मूलनिवासी मुस्लिम मंचाचा विरोध; आंदोलनाचा इशारा

ही चांगली बाब आहे पण मागील अडीच वर्ष जे मुख्यमंत्री राहिले ते एकदा देखील दिल्लीत गेले नाहीत .यामधून त्यांची सीमा वादावरून काय मानसिकता होती हे लक्षात येत असल्याचे सांगत शंभूराज देसाई यांनी ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

Story img Loader