‘एफटीआयआय’मध्ये गेले ९६ दिवस सुरू असलेला संप आणि ६ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने विद्यार्थ्यांबरोबरच चर्चेची तयारी दाखवली आहे. मंत्रालयाच्या सह सचिवांकडून विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षांना हा निरोप सोमवारीच पोहोचवला गेला असल्याची माहिती संस्थेचे संचालक प्रशांत पाठराबे यांनी दिली आहे.
मंत्रालय चर्चेस तयार असल्याच्या मिळालेल्या निरोपाविषयी विद्यार्थी सांगत असलेली माहिती मात्र वेगळीच आहे. हा निरोप आपल्याला संचालक पाठराबे यांनीच मंगळवारी दिला असून त्याबद्दल अद्याप लेखी स्वरूपात काहीही मिळाले नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी, ज्योती सुभाष यांच्यासह विविध कलाकार मंगळवारी ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष गजेंद्र चौहान यांची दिग्गज आंतरराष्ट्रीय चित्रपटनिर्मात्यांच्या चमूकरवी मुलाखत घेऊन मगच त्यांच्या पात्रतेविषयी निर्णय व्हायला हवा, असे मत पुरी यांनी व्यक्त केल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. ज्येष्ठ कार्यकर्त्यां सुलभा ब्रrो, प्रसिद्ध चित्रकार राजू सुतार व दीपक सोनार या वेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या ‘नो मोअर पपेट शोज’ या कार्यक्रमात विद्यार्थी व समर्थकांनी एकत्रितपणे एक भव्य आकाराचे चित्र रंगवून आपला पाठिंबा दर्शवला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा