पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची शनिवारी येरवडा येथील बाल न्याय मंडळाच्या कार्यालयात एक तास गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यावेळी मुलाची आई शिवानी अगरवाल, तसेच बाल संरक्षण अधिकारी उपस्थित होते. अल्पवयीन मुलासह त्याच्या आईनेही पोलिसांना चौकशीत माहिती दिली नाही. तसेच त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाची पालकांसमोर चौकशी करण्यास बाल न्याय मंडळाने पोलिसांना दिली. त्यानंतर येरवड्यातील बाल न्याय मंडळाच्या कार्यालयात शनिवारी अल्पवयीन मुलाची चौकशी गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी केली. अपघाताच्या वेळी मोटार कोण चालवित होते. ब्लॅक आणि कोझी पबमध्ये कोण उपस्थित होते, तसेच ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने घेण्यात आले. तेव्हा कोण उपस्थित होते, याबाबतची माहिती पोलिसांनी घेतली. त्यावेळी अल्पवयीन मुलाने पोलिसांना तपासात फारशी माहिती दिली नाही.अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवालने उत्तरे दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा…मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कोंडी; सलग सुट्यांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी
चौकशीत मुलाची त्रोटक उत्तरे
बाल न्याय मंडळात अल्पवयीन मुलाची पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा त्याने पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना त्रोटक उत्तरे दिली. त्यावेळी बाल न्याय मंडळातील सदस्य, मुलाची आई शिवानी अगरवाल उपस्थित होते. मुलाची दोन तास चौकशी करण्यात आली. अपघातावेळी मोटारीत आणखी कोण होते? मोटार कोण चालवत होते? अपघात नेमका कसा झाला? यासह अनेक प्रश्न पोलिसांनी मुलाला विचारले. त्यावर ‘ नेमके आठवत नाही ’, ‘लक्षात येत नाही’, अशी उत्तरे मुलाने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.