लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कात्रज भागात घरफोडी, महिलांकडील दागिने चोरणाऱ्या चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले. अल्पवयीनाने मौजमजेसाठी घरफोडी, दागिने चोरीचे तीन गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्याकडून दुचाकी, दागिने असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

भारती विद्यापीठ परिसरात पादचारी महिलेकडील दागिने चोरून नेण्यात आले होते. पसार झालेल्या दुचाकीस्वार चोरट्याचा माग काढण्यात येत होता. गस्त घालणारे पोलीस शिपाई मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांना‌ अल्पवयीनाने महिलेचे दागिने चोरुन नेल्याची मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला कात्रज-कोंढवा रस्त्यावरील पेरुची बाग परिसरातून ताब्यात घेतले. तपासात त्याने भारती विद्यापीठ परिसरात घरफोडीचे दोन गुन्हे, तसेच दागिने चोरीचा एक गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून १३ ग्रॅम सोन्याचे दागिने, दुचाकी असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आणखी वाचा-पुणे : प्रभात रस्त्यावर व्यावसायिकाचा मोबाइल चोरणारा गजाआड

पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगा साळगावकर, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता देवकाते, राहुलकुमार खिलारे, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी आणि तपास पथाकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

Story img Loader