आपल्या मुलीसमवेत बोलत असल्याच्या रागातून त्या मुलीच्या वडील आणि भावाने लोखंडी कांबेने मारहाण करून तसेच दगडाने ठेचून अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे घडली. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा >>> घरफोडीत साडेआठ लाखांचा ऐवज चोरीला; बालेवाडी, सिंहगड रस्ता परिसरातील घटना
याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा आणि आरोपी, दोन्ही कुटुंबे एकाच भागात राहतात. मुलगा आपल्या मुलीशी बोलत असल्याचा संशय आरोपींना होता. त्याचा राग आरोपींच्या मनात होता.
हेही वाचा >>> ‘राजगुरुनगर’ अत्याचार प्रकरणात आरोपीला न्यायालयीन कोठडी
दरम्यान, बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास मुलगा नेहमीप्रमाणे मित्रासोबत वस्तीत थांबलेला होता. तेव्हा आरोपींनी मुलाला गाठले. तिघांनी गणेशवर लोखंडी कांब आणि दगडाने हल्ला केला. हल्ला इतका क्रूर होता की, मुलग्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात चांगलाच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी येथे धाव घेतली. तसेच, तिघांना ताब्यात घेतले. या खुनामुळे मात्र, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.