लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : येरवडा येथील पंडीत जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्रात मुलाच्या डोक्यात फरशी मारून त्याला जखमी केल्याप्रकरणी अल्पवयीनाविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

येरवड्यात पं. जवाहरलाल नेहरु उद्योग केंद्र संचलित बालसुधारगृह आहे. रविवारी (३० जून) दुपारी एकच्या सुमारास बालसुधारगृहातील मुलांना रांगेत उभे करण्यात आले. त्यावेळी एकाने मुलाच्या डोक्यात फरशी (टाइल) मारुन त्याला जखमी केले. त्यावेळी बालसुधारगृाहतील कर्मचाऱ्यांनी टाइल मारणाऱ्या मुलाला पकडले.

आणखी वाचा-पुणे : थकीत पैसे मागितल्याने अंगावर पाळीव श्वान सोडले; श्वानाच्या हल्ल्यात महिला जखमी

बालसुधारगृहात झालेल्या वादातून मुलाला मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्या मुलाविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, बालसुधारगृहातील काळजीवाहू (केअरटेकर ) महेश चंद्रकांत जाधव (वय ३७) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार देसाई तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minor boy was injured by hitting floor on his head at childrens reformatory in yerawada pune print news rbk 25 mrj