पुणे : प्रेमप्रकरणातून छत्तीसगडमधून अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीवर रेल्वे सुरक्षा दलातील (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) हवालदाराने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हवालदाराच्या साथीदारास पुणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे.

कमलेश तिवारी (मूळ रा. उत्तर प्रदेश ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलातील (आरपीएफ) हवालदार अनिल पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार पसार झाला असून, त्याचा लोहमार्ग पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. याबाबत एका अल्पवयीन मुलीने पुणे रेल्वे स्थानक लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित अल्पवयीन मुलीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. दोघे जण मूळचे छत्तीसगडमधील आहेत. दोघे जण छत्तीसगडमधून पसार झाले. त्यानंतर मुलीच्या पालकांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार छत्तीसगडमधील स्थानिक पोलीस ठाण्यात दिली होती.

Nagpur Bench of Bombay High Court held Even with consent of minor wife physical intercourse is part of rape
अल्पवयीन पत्नीसोबत सहमतीतून शारीरिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालय म्हणाले, ‘पीडितेच्या इच्छेविरोधात…’
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
Mumbai High Court
“मुलीने हॉटेलची खोली बुक केली म्हणजे तिची शारीरिक संबंधांना संमती आहे असे नाही,” उच्च न्यायालयाचं परखड मत!
sexual harassment crime victim, compensation,
लैंगिक छळाच्या गुन्ह्यात पीडितेला नुकसान भरपाईचा आदेश देणे अपेक्षित…
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
Solapur rape marathi news
सोलापूर: मागास अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आठ जणांना जन्मठेप, तिघांना सक्तमजुरी

हेही वाचा >>> अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलसह तीन आरोपींना पुणे पोलिसांनी घेतले ताब्यात

छत्तीसगडमधील स्थानिक पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या प्रियकराविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गेल्या महिन्यात मुलगी आणि तिचा मित्र पुणे रेल्वे स्थानकात सापडले. मुलगी अल्पवयीन असल्याने रेल्वे सुरक्षा दलाने तिला एका संस्थेत ठेवले. संबंधित संस्था ताडीवाला रस्ता भागात असून, या संस्थेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलाकडे आहे. पुणे रेल्वे स्थानकात सापडलेल्या अल्पवयीन मुलांना या संस्थेत दाखल करण्यात येते. मुलांच्या पालकांचा शोध घेऊन याबाबतची माहिती पालकांना देण्यात आली.  अल्पवयीन मुलीवर संस्थेतील कर्मचारी तिवारी आणि हवालदार पवार यांनी  बलात्कार केला. दरम्यान, अल्पवयीन मुलगी सुखरुप सापडल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनी छत्तीसगड पाेलिसांना दिली. छत्तीसगड पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन तिला पालकांच्या ताब्यात दिले. मुलीची चौकशी करण्यात आली. तेव्हा रेल्वे सुरक्षा दलातील हवालदार पवार आणि  संस्थेतील कर्मचारी तिवारीने बलात्कार केल्याची माहिती दिली. त्यानंतर याप्रकरणी छत्तीसगडमधील स्थानिक पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित गुन्हा पुणे रेल्वे स्थानक पोलीस ठाण्याकडे तपासासाठी सोपविण्यात आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड आणि पथकाने तातडीने तपास सुरु केला. तिवारीला अटक करण्यात आली असून, लोहमार्ग पोलीस दलातील उपविभागीय अधिकारी देवीकर तपास करत आहेत.

हेही वाचा >>> पुणे : धक्कादायक..! वाघोलीत प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

 ‘आरपीएफ’मधील हवालदार निलंबित 

छत्तीसगडमधून प्रियकरासोबत पळून आलेल्या मुलीवर बलात्कार करणारा रेल्वे सुरक्षा दलातील हवालदार अनिल पवारला निलंबित करण्यात आले असून, तो पसार झाला आहे. हवालदार पवार याचा शोध घेण्यात येत आहे.