लोकसत्ता वार्ताहर

शिरुर : सोशल मिडियावरील इंस्टाग्रामवर ओळख आणि मैत्री करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी १६ वर्षीय विधी संघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ मार्च २०२५ रोजी दुपारी ३ वाजता व ६ मार्च रोजी दुपारी २ च्या सुमारास कारेगाव ता. शिरूर जि पुणे येथील मल्हार हिल्स येथे हा प्रकार घडला .

अल्पवयीन मुलगा वय १६ वर्ष याने अल्पवयीन मुली सोबत इन्स्टाग्रामवर ओळख करून तीचेशी मैत्री केली व कारेगाव येथील त्याचे राहते घरी घेवुन जावुन मी तुझ्यावर खुप प्रेम करतोय, तु मला खुप आवडतेस असे म्हणुन जबरदस्तीने दोन वेळा शारीरीक संबंध केले. तसेच सदर गोष्ट कोणाला सांगितली तर जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. याप्रकरणी पोलीसांनी बाल लैंगिक अ. सं.अधि.२०१२ चे कलम ४,८,१२.अ.जा.ज.अत्या. प्रति. सुधा.अधि.२०१५ चे कलम ३(१) (w) (i) (ii),३(२)(v) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी विधीसंघर्षित बालक यास ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात आली असून पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे आधिक तपास करीत आहेत .

Story img Loader