पिंपरी : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणातील आरोपीला वडगाव मावळ सत्र न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
विशाल मधुकर लाखे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल आणि पीडितेची ओळख होती. ओळखीचा फायदा घेऊन त्याने तिच्याशी जवळीक साधली. तिला फूस लावून लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्यावर अत्याचार केला. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी विशाल याला अटक केली.
हेही वाचा…दापोडी निगडी मार्गावर आता एकसमान रचनेचे पदपथ; काय करणार आहे महापालिका?
या प्रकरणात आठ साक्षी नोंदविण्यात आल्या. दोन्ही बाजूंंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला २० वर्षे कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून स्मिता चौगले यांनी काम पाहिले.