बारामती : बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणाच्या तपासात मुलींना धमकावून त्यांना दारु पाजण्यात आली, तसेच त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदाराचा शोध सुरू आहे, अशी माहिती बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी दिली.

अल्पवयीन मुलींचे अपहरण करून अत्याचार प्रकरणात ज्ञानेश्वर भरत आटोळे (वय २७), यश उर्फ सोन्या शिवाजी आटोळे (वय २१, दोघे रा. सावळ, ता. बारामती), प्रमोद बेंगारे (वय २०, रा. रुई, ता. बारामती) यांना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Nagpur Bench of Bombay High Court held Even with consent of minor wife physical intercourse is part of rape
अल्पवयीन पत्नीसोबत सहमतीतून शारीरिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालय म्हणाले, ‘पीडितेच्या इच्छेविरोधात…’
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
mumbai 16 year old deaf mute girl raped
मुंबई : मूक-बधीर मुलीवर लैंगिक अत्याचार
300 crore extortion from female officer on fear of involvement in embezzlement Mumbai print news
३०० कोटींच्या गैरव्यवहारातील सहभागाची भीती दाखवून महिला अधिकाऱ्याकडून खंडणी उकळली; चौघांविरोधात गुन्हा

हेही वाचा >>> पुणे : टँकरच्या धडकेत बांधकाम कंपनीतील व्यवस्थापकाचा मृत्यू ; बाह्यवळण मार्गावरील वडगाव पुलावर अपघात

बारामती परिसरातून १४ सप्टेंबर रोजी दोन शाळकरी मुली बेपत्ता झाल्याप्रकरणी दोन तक्रारी बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर बारामती तालुका पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलीस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख, उपविभागीय अधिकारी डाॅ. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. मुली एसटीने पुण्यात पोहोचल्या. त्यांनी ज्ञानेश्वर आटोळे याच्याशी संपर्क साधला. त्याने हडपसर भागातील दोन मित्रांना याबाबतची माहिती दिली. मुली हडपसर परिसरात येणार असल्याचे त्याने मित्रांना सांगितले. मुलींपाठोपाठ आटोळे हडपसर भागात गेला. तेथे एका मित्राच्या खोलीवर मुलींना नेण्यात आले. आरोपींनी मुलींना धमकावून त्यांना दारु पाजली. त्यांच्यावर सामुहिक अत्याचार केले. घाबरलेल्या एका मुलीने आईच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. बारामती पोलिसांना या घटनेची माहिती कळविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी पुण्यातील हडपसर पोलिसांशी संपर्क साधला. बारामती पोलिसांचे पथक हडपसरमध्ये पोहोचले. पोलिसांनी मुलींना ताब्यात घेतले.

हेही वाचा >>> दारु पिताना झालेल्या वादातून मेहुण्याला भोसकले, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकास अटक

समुपदेशनातून अत्याचाराचा प्रकार उघड

मुलींना हडपसर परिसरातून ताब्यात घेण्यात आल्यानंतर पोलिसांचे पथक बारामतीत पोहोचले. मुलींची महिला पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी केली. पोलिसांनी त्यांना धीर दिला. समुपदेशनातून मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर आटोळे, अनिकेत बेंगारे, सोन्या आटोळे यांना अटक करण्यात आली. आरोपींची मुलींशी ओळख होती. याप्रकरणी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला.

संवेदनशील प्रकरणात त्वरीत मदत

संवेदनशील प्रकरणात नागरिकांनी पोलिसांची मदत घ्यावी. अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणात पालक आणि शिक्षकांन त्वरीत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी केले आहे.

अल्पवयीन मुलींचे अपहरण आणि अत्याचार प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. याप्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, साथीदाराचा शोध सुरू आहे. –पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण