वैमनस्यातून अल्पवयीनावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका अल्पवयीनाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> महापालिका भवन परिसरात तरुणाला धमकावून सोनसाखळी चोरी

अल्पवयीन आणि त्याचा मित्र रणजीत भट यांचा आरोपींशी वाद झाला होता. बिबवेवाडी भागातून अल्पवयीन आणि त्याचा मित्र रात्री दहाच्या सुमारास निघाले होते. त्यावेळी चैत्रबन वसाहतीत टोळक्याने त्यांना अडवले. त्यांना शिवीगाळ करण्यात आली. अल्पवयीनाच्या डोक्यात कोयत्याने वार करण्यात आले, तसेच त्याचा मित्र रणजीत याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. पसार झालेल्या टोळक्याचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minor stabbed with koyta over enmity pune print news rbk 25 zws