समस्त खवय्यांसाठी आणि त्यातल्या त्यात मिसळप्रेमींसाठी आज एक आनंदाची बातमी. तीन दिवसांचा मिसळ महोत्सव सुरू झालाय. गेल्या वेळी तसा तो पुण्यापासून लांब होता. डोणजे येथे. सध्या सुरू असलेल्या महोत्सवाची जागा सहज जाता येईल अशी आहे. तेव्हा मिसळप्रेमींनो, हा महोत्सव चुकवू नका. फक्त एकटे जाऊ नका. एवढाच आपला प्रेमाचा सल्ला. कारण एकटं गेलं, तर एकटय़ानी किती मिसळ आणि काय काय खायचं, असं होऊन जाईल. त्यामुळे दोन-चार जण मिळून ग्रुपने गेलात तर महोत्सवात धमाल करता येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एकूणच खाद्य महोत्सवांमध्ये भरपूर स्टॉल असतात आणि खूप गर्दीही असते. हे नेहमीचंच चित्र. या महोत्सवाचं वैशिष्टय़ं हे की इथे दर्जेदार स्टॉल आहेत आणि खाणाऱ्यांसाठी भरपूर टेबल-खुच्र्याही आहेत. त्यामुळे सर्व पदार्थाचा छान आस्वाद घेता येतोय. तर तिथे गेल्यावर आधी एकदा सर्व स्टॉल फिरून बघा. सगळं वातावरण खवय्यांना भावेल असं आहे. त्यामुळे ही फेरी झाली की मग तुमच्या आवडीनुसार कोणत्या स्टॉलवर कोणती मिसळ खायची किंवा इतर कुठले कुठले पदार्थ खायचे ते ठरवा आणि मग आस्ते आस्ते एकेका स्टॉलची फेरी सुरू करा.
वडोबा, मिसळ मंडळ, श्रीरामपूरची मिसळ देणारे श्रावणी स्नॅक्स, नाशिक मिसळीसाठी माउली स्नॅक्स, मणिनगर-गुजरातचा मिसळ दरबार हे आणि असे अन्यही स्टॉल इथे एकदा पाहून घेतले की मग कोणत्या गावची मिसळ खायची याचा निर्णय करता येईल. बदल हवा असेल तर सरळ ‘वडोबा’वर जा. तिथे स्पे. निखारा मिसळची ऑर्डर द्या. शिवाय दोघे-तिघे असाल तर तिथे एक उपवासाचीही मिसळ घ्याच. मीनाक्षी पारखे आणि जागृती भुरे यांचा हा स्टॉल आहे. शिवाय तिथे कोल्हापुरी मिसळही आहेच. पुण्यात ‘मिसळ दरबार’ अजून सुरू व्हायचंय. पण त्याची एक शाखा मणिनगरला सुरू आहे. तिथे नेहमीची लाल रश्श्याची मिसळ आहेच. पण तिथे गेलात तर हिरव्या रश्श्याची ग्रीन मिसळ मागवा. बघा तर ती चव चाखून. ‘मिसळ मंडळ’ हे नाव अनेकांना परिचित आहे. त्यांच्या स्टॉलवर कोल्हापुरी, दही आणि चीज मिसळ असे तीन प्रकार आहेत. शिवाय कटवडाही आहेच. श्रीरामपूरची प्रसिद्ध मिसळ देणारा श्रावणी स्नॅक्सचा स्टॉलही इथे आहे आणि नाशिकची स्पेशल मिसळ टेस्ट करून बघायची असेल तर माउली मिसळीचाही स्टॉल इथे आहे.
बेळगावहून आलेल्या नीलेश आणि श्रीपती पाटील यांच्या स्टॉलवरही आवर्जून जा. शेंगदाणा आलेपाक आणि आलेपाक पोहे हे या स्टॉलवरचे एकदम टेस्टी पदार्थ. पातळ पोहे, ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं, चुरमुरे, शेगदाणे वगैरे वापरून तयार केलेले हे पोहे चविष्ट तर आहेतच, शिवाय इथला फुटाण्याच्या पिठाचा लाडू हाही एक मस्त प्रकार. तोही खायला चुकवू नका. शिवाय या पोह्य़ांचा दरही तीस रुपये प्लेट असा आहे. पाटील यांच्या शेतातील उसाचा रस किंवा सेंद्रिय गूळ किंवा काकवी याचीही खरेदी इथे करता येईल. गुळाची ढेप ऐंशी रुपयांना आहे.
नागपूरच्या भूषण समर्थने ‘वैदर्भीय चवी’चा आस्वाद घ्यायची संधी इथे दिली आहे. कांदे पोहे आणि सावजी मसाला वापरून तयार केलेला हरभऱ्याचा रस्सा अशी इथली र्ती-पोहे ही डिश घ्या किंवा आलूबोंडा रस्सा चाखून पाहा. शिवाय वैदर्भीय मिसळही इथे आहे. पिंरगुटचा प्रसिद्ध ‘श्रीपाद’ हा स्टॉलही आहे. तिथे खमंग थालीपीठ किंवा मिसळ-पाव घेता येईल.
मिसळीचा आस्वाद घेतल्यानंतर आणखी काय खाऊन पाहायचं असा विचार मनात आला तर त्यासाठीही दोन-तीन चांगले पर्याय आहेत. ‘वडोबा’च्या स्टॉलवर ताक आणि मारवाडी छास असे दोन प्रकार आहेत. त्यातलं ताक आपल्या नेहमीच्या ताकासारखं जिरेपूड घालून केलेलं. पण त्यापेक्षा मारवाडी छास नक्की घ्या. जिरेपूड, पुदिना चटणी, काळं मिठ, पालक, पुदिना, आंबट चुका वगैरे वापरून तयार झालेल्या या ताकाचा एक ग्लास केव्हा संपला हेही कळणार नाही.
ताक नको असेल, तर मग ‘प्रणव केटर्स’च्या स्टॉलवर पेरू आइस्क्रीम घेता येईल. बघा तर गंमत. शेजारीच असलेल्या ‘श्रीपाद’मध्ये सोलकढी, कोकम या पेयांचाही आस्वाद घेता येईल किंवा तिथे खरवस घेऊन या खाद्ययात्रेचा आनंद वाढवता येईल.
तर मिसळप्रेमींसाठी आणि खवय्यांसाठी अनेक चांगले पदार्थ एकाच ठिकाणी मिळण्याची अशी छान सोय झाली आहे.
- सहकारनगर, शिंदे हायस्कूल शेजारी, सातव सभागृह
- शनिवार आणि रविवार सकाळी ८ ते रात्री