आईच्या वार्धक्याचा गैरफायदा घेऊन वडिलांनी कमाविलेले ५५ लाख, साेन्याचे दागिने तसेच सदनिकेची परस्पर विक्री करून दोन कोटी ४७ लाख ७१ हजार रुपयांच्या मालमत्तेचा अपहार केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने बहिणीसह तिच्या मुलांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी उषा गुल मनसुखानी, जय गुल मनसुखानी, भावना गुल मनसुखानी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जितेंद्र दयानंद लुंगानी (वय ४९, रा. मालाड, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. कट रचणे, बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक तसेच अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उषा मनसुखानी फिर्यादी जितेंद्र लुगानी यांनी मोठी बहीण आहे. जय आणि भावना तिची मुले आहेत. त्यांनी संगनमत केले. लुगानी यांची आई वृद्ध आहे. वार्धक्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी दोन कोटी ४७ लाख ७१ हजार रुपयांच्या मालमत्तेचा अपहार केल्याची खासगी तक्रार लुंगानी यांनी न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे नुकतेच आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक मचाले तपास करत आहेत.