पुणेः विश्वसुंदरी कॅरोलिना बिएलवेल्स्का, भारत सुंदरी सिनी शेट्टी यांनी बुधवारी ससून रुग्णालयाला भेट दिली. या भेटीवेळी त्यांनी रुग्णालयात उभारण्यात आलेल्या नवजात बालक अतिदक्षता विभागाची पाहणी केली. त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात गर्दी झाली होती.
हेही वाचा >>> “शरद पवारांनी दोनदा पंतप्रधान होण्याची संधी घालवली, आता त्यांनी रिटायर्ड…”, सायरस पूनावालांचा सल्ला
वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवाले यांनी विश्वसुंदरी आणि भारत सुंदरी यांनी ससून रुग्णालयाला दिलेल्या भेटीबाबत माहिती दिली. मुकुल माधव फाउंडेशनने ससून रुग्णालयात नवजात बालक अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) उभारण्यास मदत केली आहे. या विभागाची पाहणी करण्यासाठी मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया या विश्वसुंदरी कॅरोलिना बाएवेल्स्का, भारत सुंदरी सिनी शेट्टी यांना घेऊन ससून रुग्णालयात आल्या होत्या. त्यांच्यासमवेत या विश्वसुंदरी स्पर्धेच्या संयोजन समितीच्या अध्यक्षा ज्युलिया मोरली याही होत्या. त्यांनी या विभागाची पाहणी करून ससून रुग्णालयातील या सुविधेचे कौतुक केले, असे डॉ. चंदनवाले यांनी सांगितले.
हेही वाचा >>> ‘सरळसेवा’ परीक्षार्थ्यांसाठी आमदार रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या या मागण्या