लोणावळ्यातून बेपत्ता झालेल्या दोन शाळकरी मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. ग्रामीण पोलीस तसेच उस्मानाबाद पोलिसांच्या पथकाने ही कामागिरी केली. रेल्वेने उस्मानाबादकडे जात असलेल्या मुलींना ताब्यात घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले.लोणावला ग्रामीण परिसरातील कुसगाव येथून दोन शाळकरी मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक निलेश माने आणि पथकाने तातडीने तपास सुरू केला.

हेही वाचा >>> पुणे : विवाहाच्या आमिषाने डॅाक्टर तरुणीची फसवणूक ; फसवणूक प्रकरणी डॅाक्टरच्या विरोधात गुन्हा

Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
mpsc result latest marathi news
‘एमपीएससी’च्या समाज कल्याण अधिकारी पदाचा निकाल जाहीर, मात्र केवळ ‘या’ उमेदवारांना मुलाखतीची संधी
Nagpur female missing
उपराजधानीतून वर्षभरात ५५९ मुली-महिला बेपत्ता, बेपत्तांमध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण जास्त
Female officer of provident fund office assaulted Shivajinagar police files case against businessman
भविष्य निर्वाह कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की, शिवाजीनगर पोलिसांकडून व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
tigers missing tipeshwar wildlife sanctuary
टिपेश्वर अभयारण्यातील दोन वाघ बेपत्ता?
Gadchiroli, Surrender women Naxalites, Naxalites,
गडचिरोली : दोन जहाल महिला नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, तब्बल ५३ गुन्ह्यांची…
Minister Pankaja Mundes clarification on Anjali Damanias allegations
बीडमधील अधिकारी मी नेमलेले नाहीत, आरोपांबद्दल मंत्री पंकजा मुंडे यांचे स्पष्टीकरण

सीसीटीव्ही चित्रीकरणात पुणे रेल्वे स्थानक परिसरात पनवेल-नांदेड या गाडीतून मुली प्रवास करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती उस्मानाबाद पोलीस दलातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांना कळविली. उस्मानाबाद रेल्वे स्थानक परिसरात पनवेल- नांदेड रेल्वे गाडी थांबली. पोलिसांच्या पथकाने मुलींना ताब्यात घेऊन चौकशी केली. मुली सुखरुप असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, घुगे, जय पवार उस्मानाबादला रवाना झाले. पोलिसांनी मुलींना ताब्यात घेतले.

हेही वाचा >>> पुणे : आवक कमी झाल्याने टोमॅटो,फ्लॅावर, शेवग्याच्या दरात वाढ ; घेवडा, वांगी स्वस्त

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॅा. अभिनव देशमुख, अतिरिक्त अधीक्षक मितेश घट्टे, लोणावळा उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब ढोले तसेच अतिरिक्त अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सीताराम डुबल, सहायक निरीक्षक निलेश माने, सचिन राऊळ आदींनी ही कारवाई केली.

Story img Loader