पिंपरी: भाजपकडून बारामती तथा मुंबईसाठी कोणतेही ‘मिशन’ नाही, अशी स्पष्टोक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पिंपरीत पत्रकारांशी बोलताना केली. भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीचे सरकार राज्यात प्रस्थापित होईल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून जेवढे उमेदवार दिले जातील, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी भाजपची आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

हेही वाचा : शिंदे गटाने लढवलेल्या कोणत्याही जागेवर दावा नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

BJP Mahesh Landge Ajit Gavhane Bhosari vidhan sabha
Bhosari vidhan sabha election results 2024 : भाजपच्या महेश लांडगेंची हॅट्रिक; अजित गव्हाणेंचा केला पराभव
Rahul kalate Defeat in Chinchwad will hurt Sharad Pawar says Shankar Jagtap afater assembly election result
Chinchwad Assembly Constituency : अमोल कोल्हेंच्या हट्टापायी कलाटेंना…
Assembly Election Result 2024 BJPs Madhuri Misal wins fourth consecutive term asserting dominance in Parvati Constituency
‘पर्वती’वर भाजपचा झेंडा! सलग चौथ्यांदा माधुरी मिसाळ बनल्या आमदार
assembly election 2024 ncp sharad pawar candidate Prashant Jagtap objected to results in Hadapsar and demanded vote recount
हडपसर मध्ये निकाल बदलणार? राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रशांत जगताप यांची मागणी
anna bansode victory in Pimpri Assembly
पिंपरी विधानसभा: अजित पवार मंत्रीपद देतील; विजयानंतर अण्णा बनसोडे यांचा विश्वास
NCP Ajit Pawar MLA Anna Bansode scored hatt rick from Pimpri Assembly constituency in city
पिंपरीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांची हॅट्ट्रिक
assembly election 2024 result ncp ajit pawar party MLA Sunil Shelke wins in Maval constituency
मावळ ‘पॅटर्न फेल’, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सुनील शेळके विजयी
pimpri chinchwad vote counting
पिंपरी : मतमोजणीसाठी पिंपरी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; किती पोलीस असणार तैनात?

भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी बावनकुळे शहरात आले होते. तेव्हा पत्रकारांनी बावनकुळे यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले की, २०२४ मध्ये जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा कोणाच्या पायाखालची वाळू घसरते हे स्पष्टपणे दिसून येईल. यापुढे भाजप शिवसेना एकत्र लढणार आहे. आगामी निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मोलाचे ठरणार आहे. महाराष्ट्र आता यापूर्वीची चूक पुन्हा करणार नाही. जनता भाजपच्या पाठीशी अगोदरही होती आणि आताही आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजपला बहुमत मिळाले होते. मात्र, उध्दव ठाकरे यांच्याकडून दगाफटका झाल्याचे राज्यातील जनतेने पाहिले आहे. आता खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहे. उध्दव ठाकरे यांचा केवळ गट आहे. मुख्यमंत्र्यांना दिवसेंदिवस जनतेचे पाठबळ मिळत आहे, याकडे बावनकुळे यांनी लक्ष वेधले. काँग्रेस पक्षाला शेवटची घरघर लागली असून त्यांची ‘भारत जोडो’ यात्रा हा फुसका बार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात शहराध्यक्ष गैरहजर

बुधवारी सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निवासस्थानी पोहोचले. माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर माई ढोरे, माजी पक्षनेते नामदेव ढाके यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, शहराध्यक्ष महेश लांडगे व त्यांचे समर्थक अनुपस्थित होते. आमदार लांडगे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार बाहेर गेले होते. याबाबतची कल्पना त्यांनी प्रदेशाध्यक्षांना दिली होती, असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.