‘‘संघातील प्रत्येकाने आपली जबाबदारी नेटाने पार पाडणे, योग्य वेळी आवश्यक असलेले मार्गदर्शन मिळणे यांमुळेच रोबोकॉन इंडिया स्पर्धेत यश मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची उत्सुकता आहे,’’ अशी भावना एमआयटीच्या संघाचे नेतृत्व करणाऱ्या सर्वेश चक्रदेव याने बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
या वेळी एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, एमआयटीच्या इलेक्ट्रॉनिक विभागातील प्राध्यापिका सविता कुलकर्णी, प्राध्यापक एस. आर. येवलेकर उपस्थित होते. एमआयटी आणि प्रसारभारतीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रोबोकॉन इंडिया स्पर्धेत एमआयटीच्या संघाला नुकतेच विजेतेपद मिळाले. व्हिएतनाम येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये हा संघ भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या संघामध्ये अंकुर देव, ऐश्वर्या हेंद्रे, अक्षय यंबरवार, सुरभी राजे, प्राजक्ता गोखले, अश्विन जैन, चारुदत्त पारखे, भैरव शहा, जयेश जैन, चित्रश कपूर या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा