पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. माजी नगरसेवकांनी आणि इच्छुकांनी अण्णा बनसोडे यांचं काम करणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यावर अण्णा बनसोडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी हे मोठे कुटुंब आहे अशा किरकोळ गोष्टी होत असतात, त्या लवकर मिटवल्या जातील. असं अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केलं आहे. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल यांनी देखील त्यांचं मत व्यक्त केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, आमच्यात काही अलबेल नाही. राष्ट्रवादी हे मोठं कुटुंब आहे. किरकोळ गोष्टींचा वाद आहे. शहराध्यक्ष योगेश बहल आणि मी या सर्वांना विश्वासात घेऊन जो काही वाद असेल तो मिटवणार आहोत. महायुतीचा उमेदवार म्हणून ते सर्व माझा प्रचार करतील. असं बनसोडे म्हणाले,त्यानंतर शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले, माझा आमदार अण्णा बनसोडे यांना विरोध नव्हता किंवा नाराजी नव्हती. आम्ही नाराज इच्छुकांची आणि माजी नगरसेवकांची भेट घेणार आहोत. त्यांची समजूत काढणार आहोत.आणि आमदार अण्णा बनसोडे हे विजयी होतील. असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla anna bansode candidature has been announced from pimpri assembly constituency pimpri kjp 91 amy