माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने अजित पवारांचे पदाधिकारी, नेते आक्रमक झाले आहेत. शिवतारे यांनी त्यांची भाषा बदलली नाही आणि महायुतीचा धर्म पाळला नाही, तर आम्ही देखील महाराष्ट्रासह मावळमध्ये महायुतीचा धर्म पाळणार नाहीत अशी रोखठोक भूमिका अजित पवार यांचे कट्टर समर्थक विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांनी घेतली आहे.
हेही वाचा >>> किल्ले शिवनेरीवर प्लास्टिक बंदी लागू; जुन्नर वनविभागाचा निर्णय
अण्णा बनसोडे म्हणाले, अवघ्या महाराष्ट्रासह मावळ, बारामतीत महायुती म्हणून सर्व एकत्र काम करत आहेत. मावळ, बारामतीत महायुतीचा धर्म पाळणे गरजेचं आहे. मात्र, विजय शिवतारे जे वक्तव्य करत आहेत ते चुकीचं आहे. जर त्यांनी अशीच वक्तव्ये सुरू ठेवली तर मावळ लोकसभा मतदारसंघात युतीचा धर्म पाळणार नाहीत. पुढे ते म्हणाले, महायुतीचा धर्म पाळला नाही म्हणजे विरोधकांना मदत होईल अस आम्हाला वाटत नाही. आमच्या नेत्याला माजी मंत्र्याने अशोभनीय भाषा वापरणे हे महाराष्ट्रातील राजकारणात शोभणारे नाही. पुढे ते म्हणाले, शिवतारे यांनी माघार घेतली नाही तर आम्ही महायुतीचा धर्म पाळणार नाहीत. अशी रोखठोक भूमिका आमदार अण्णा बनसोडे यांनी घेतली आहे.