विरोधी पक्ष नेते अजित पवार जो निर्णय घेतील, त्या निर्णयासोबत मी असेन, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी घेतली आहे. अण्णा बनसोडे आज मुंबईत जाऊन अजित पवारांची भेटही घेणार आहेत. हे तेच अण्णा बनसोडे आहेत, जे पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवारांसोबत होते.
शेवटच्या क्षणापर्यंत अण्णा यांनी अजित पवारांना त्या वेळीही पाठिंबा दिला होता, आताही अजित पवार भूकंप करतील, अशी चर्चा सुरू असताना, तेच अण्णा त्यांच्या पाठीशी उभे राहायला तयार झालेत. दादा जो निर्णय घेतील त्याला माझी सहमती असेल अन् शेवटपर्यंत मी त्यांच्यासोबत असेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
पहाटेच्या शपथविधीच्या वेळी अजित पवार यांच्या पाठीशी सावलीप्रमाणे उभे राहिलेले मावळचे आमदार सुनील शेळके यांनी अजित पवारांच्या पाठीशी उभं राहणार असल्याच म्हटलंय. पक्ष म्हणून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं त्यांनी म्हटलंय. अजित पवार हे भाजपात जाणार या चर्चेवर बोलताना या अफवा असल्याचं म्हटलंय.-सुनील शेळके- मावळ,आमदार