पिंपरी : मी अश्विनी लक्ष्मण जगताप आहे. माझ्या नादी लागू नका, मला हलक्यात घेऊ नका, पाठीमागून वार करणे सोडा, पुढे येऊन वार करा असे आव्हान देत चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी भाजपा सरचिटणीस नामदेव ढाके यांना सर्वांसमोर खडेबोल सुनावले. जगताप यांचा रौद्रावतार पाहून सर्वजण अवाक झाले.

मावळ लोकसभा प्रवास दौरा, घर चलो अभियानाच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ११ ऑक्टोबर रोजी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर येणार आहेत. याची माहिती देण्यासाठी शहर भाजपाने पत्रकार परिषद बोलविली होती. आमदार अश्विनी जगताप वेळेवर पत्रकार परिषदेला उपस्थित होत्या. शहराध्यक्ष शंकर जगताप हे उशिरा आले. आमदार अश्विनी जगताप आणि शहराध्यक्ष शंकर जगताप या दीर-भावजयमध्ये सुप्त राजकीय संघर्ष सुरू असल्याची नेहमीच चर्चा होते. पत्रकार परिषद संपताच शहराध्यक्ष जगताप बाहेर पडले.

What Gopal Shetty Said?
Gopal Shetty : भाजपात बंडखोरी! गोपाळ शेट्टींकडून अपक्ष अर्ज दाखल, म्हणाले; “बोरीवली काय धर्मशाळा…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Salman Khan struggles with sleepless nights after Baba Siddique’s murder
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर ‘अशी’ आहे सलमान खानची अवस्था; झिशान सिद्दिकी खुलासा करत म्हणाले, “भाई खूप…”
Shivena Shinde group, rebel in ncp Sharad Pawar,
भाजप, शिवसेना शिंदे गट पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात बंडखोरी
anupam kher kirron kher love story
घटस्फोटित अन् एका मुलाची आई असलेल्या किरण यांच्या प्रेमात पडले होते अनुपम खेर, ‘अशी’ झाली होती पहिली भेट
laxman dhoble leaving bjp joining sharad pawar ncp
आपटीबार : दुबळे कारण
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : भाजपाबरोबर जाण्याच्या चर्चांवर संजय राऊत म्हणतात, “आम्ही त्यांच्याशी हातमिळवणी…”
anupam kher on not having own child
पत्नीला पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाला स्वीकारलं; मात्र अनुपम खेर यांना स्वतःचं मूल नसल्याची खंत, म्हणाले, “तो…”

हेही वाचा – पुणे : तारांकित हॉटेलमधील जलतरण तलावात बुडून प्राध्यापकाचा मृत्यू

पत्रकार परिषद झाल्यानंतर आमदार अश्विनी जगताप आक्रमक झाल्या. त्या म्हणाल्या, ‘मी अश्विनी लक्ष्मण जगताप आहे. माझ्या नादी लागू नका, मला हलक्यात घेऊ नका, प्रत्येकवेळी मला डावलले जाते. पाठीमागून वार करणे सोडा, पुढे येऊन वार करा असे आव्हान देत आमदार जगताप यांनी भाजप सरचिटणीस नामदेव ढाके यांना सर्वांसमोर खडसावले.

हेही वाचा – पिंपरीतील जलतरण तलावांचे होणार सुरक्षाविषयक लेखापरीक्षण

याबाबत विचारले असता राजशिष्टाचार पाळला जात नसल्याने मी बोलल्याचे आमदार जगताप म्हणाल्या. तर, मी मागे बसल्याने पुढे बसा, पक्षाचे सरचिटणीस आहात असे आमदारांनी म्हटल्याचे ढाके म्हणाले.