पिंपरी : फक्त सरकार टिकावे म्हणून ग्राहकांचा, खाणाऱ्यांचा विचार केला आहे. कांदा नाही खाल्ला तर कोण मरणार नाही. पण, शेतकऱ्यांचे नुकसान का करता. कांद्यावर निर्यात शुल्क लावण्याची गरज नव्हती. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरची व्यवस्था तुम्ही आज करून ठेवताय एवढी नालायकी? का तर अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार कांद्याचे भाव वाढल्याने पडल्यामुळे असे केले जात आहे. सरकार नामर्द असून सरकार विरोधात आंदोलन करणार असल्याचे सांगत आमदार बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

चिंचवड येथे दिव्यांग कल्याण विभाग ‘दिव्यांगाच्या दारी’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापूर्वी कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सरकार नामर्दासारखे वागत आहे. फक्त सरकार टिकावे म्हणून ग्राहकांचा, खाणाऱ्यांचा विचार केला. शेतकऱ्यांचा विचार सरकार का करत नाही. मी एनडीएमध्ये असलो तरी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा रहाणे हे माझे कर्तव्य आहे. भाव वाढले तर हस्तक्षेप करता मग भाव कमी झाल्यावर का हस्तक्षेप करत नाहीत. कांदा नाही खाल्ला तर लोक मरणार आहेत का, शेतकऱ्यांचे नुकसान का करता. कांद्यावर निर्यात शुल्क लावण्याची गरज नव्हती.

Request to Urban Development Minister eknath shinde for Uruli-Phursungi TP scheme
उरुळी-फुरसुंगी ‘टीपी’साठी नगरविकास मंत्र्यांना साकडे!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Mumbaikars supplied with only clean disinfected water claims mumbai municipal administration
मुंबईकरांना निर्जंतुकीकरण केलेल्या स्वच्छ पाण्याचाच पुरवठा, महापालिका प्रशासनाचा दावा
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Loksatta pahili baju Uddhav Thackeray statement about Amit Shah on Balasaheb Thackeray's birth anniversary
पहिली बाजू: उद्धवराव, राघोबादादांना लाजवू नका!
Republic Day 2025 Democracy Constitution Republican System
गणराज्यवादाचा अर्थ शोधताना…
Sanjay Raut On BJP
Sanjay Raut : “लक्षात घ्या, राजकारणात सर्वांचे दिवस येतात”, संजय राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना मोठा इशारा
crop insurance scam loksatta news
बडे राजकारणी + विमा कंपन्या = पीक विमा घोटाळा

हेही वाचा >>>“कांदा नाही खाल्ला तर कोणी मेले आहे का? बच्चू कडूंचे वादग्रस्त विधान, कांद्याला दिला ‘हा’ पर्याय

हेही वाचा >>>पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘या’ सात गावांचा होणार समावेश

ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरची व्यवस्था तुम्ही आज करून ठेवताय एवढी नालायकी? का तर अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार कांद्याचे भाव वाढल्याने पडल्यामुळे असे केले जात आहे. मेक इन इंडिया, मेड इन इंडिया हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे. शेतकऱ्यांचा माल विदेशात गेला तर त्याला सफरचंदचा भाव मिळेल ना, आयात-निर्यात धोरणात स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. एकही जागा न मागता एनडीएला ताकदीने पाठिंबा देऊ, सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहे.

Story img Loader