प्रशासनाने सर्वसामान्य माणसांचे म्हणणे ऐकुन घ्यावे. त्यांना कामासाठी हेलपाटे मारायला लावू नका. नागरिकांना उडवाउडवीचे उत्तरे देवू नका, त्यांची कामे मार्गी लावा असे सांगून शिरुर शहरात इनडोअर स्टेडियम करण्यात येणार असल्याचे आमदार ज्ञानेश्वर कटके शिरुर येथे म्हणाले. येथील शिरुर नगरपालिकेतील मंगल कार्यालयात ‘शासन आपल्या दारी व लोकशाही दिवसाचे आयोजन ‘ करण्यात आले होते .

यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके , तहसिलदार बाळासाहेब म्हस्के, गटविकास आधिकारी महेश डोके , मुख्याधिकारी प्रीतम पाटील , पोलीस निरीक्षक संदेश केंजळे , जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहूल बाबूराव पाचर्णे , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवी काळे, शहर अध्यक्ष शरद कालेवार , महेश ढमढेरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी, एकात्मिक बालविकास योजनेचे लाभार्थी,घरकुल योजनेचे लाभार्थी, पशुसंवर्धन विभाग नाविन्य योजनाचे लाभार्थी , पंतप्रधान जन आरोग्य योजनाचे लाभार्थी, स्वंयसहाय्यक बचत गट लाभार्थी , शिधापत्रक लाभार्थी , संजय गांधी योजनाचे लाभार्थी , यांचा सन्मान करण्यात आला .

यावेळी बोलताना कटके म्हणाले की प्रशासनाने सर्वसामान्य माणसांना कामासाठी हेलपाटे मारायला लावू नका .त्याचे प्रश्न ऐकून घ्या. नागरिकांना उडवाउडवीचे उत्तरे देवू नका .प्रशासनातील आधिकारांनी त्यांना काही अडचणी असतील तर त्या सांगा राज्य शासनाला सांगून त्या अडचणी दूर करण्यात येतील . सर्वसामान्याची कामे झाली पाहीजेत. शिरुर शहरातील झोपडपट्टी , टपरी पुनर्वसन , आरक्षित भुखंड , क्रिडांगणचे प्रश्न मार्गी लावण्यात येईल . शिरुर मधील क्रिडांगणासंदर्भातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी महसुल मंत्र्याशी चर्चा करुन भव्य इनडोअर स्टेडियम उभारण्यात येणार आहे .शहरात उद्यान करण्याबरोबरच पालिकेच्या शाळांना खोल्या व संगणक उपलब्ध करुन देण्यात येईल .रस्त्यांचे रुंदीकरण व सुशोभीकरण करण्यात येईल . रस्त्याचा कडेला झाडे लावण्यात येतील .शिरुर मध्ये प्रेक्षागृह व नवीन पोलीस वसाहतीचे ही काम करण्याचा मानस कटके यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविक तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी केले . त्यात ते म्हणाले की तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या व लाभ देण्यासाठी आजच्या लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले . यावेळी महसूल , भूमापन , नगरपरिषद ,वीज , पंचायत समिती सह विविध विभागाशी संबधित प्रश्न नागरिकांनी मांडले .

Story img Loader