पुणे शहरातील कसबा पेठ भागात असलेल्या पुण्येश्वर मंदिरा परिसरातील मशिदीचे अतिक्रमण हटविण्यात यावे, या मागणीसाठी पुण्येश्वर पुनर्निर्माण समितीच्या वतीने पुणे महापालिकेच्या बाहेर भाजपाचे नेते आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. आमदार महेश लांडगे, समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह विविध हिंदू संघटनांचे प्रतिनिधी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी आमदार लांडगे यांनी ४८ तासांत अतिक्रमणावर कारवाई करा, अशी मागणी केली.
महेश लांडगे म्हणाले की, पुण्येश्वर मंदिराच्या परिसरात अनधिकृतपणे मशीद असून त्या ठिकाणी इमारतदेखील उभारण्यात आली आहे. ते अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश आहेत, तरीदेखील महापालिका आयुक्त विक्रम कुमार कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नाही. त्यामुळे पुढील ४८ तासांत कारवाई करण्याचा विक्रम न दाखवल्यास, आम्ही अयोध्येत जाऊन बाबरी मशीद पाडू शकतो, तर पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील मशिदीचे अतिक्रमणही पडू शकतो. त्यामुळे आम्हाला कायदा हातामध्ये घेण्यास भाग पडू नका.
हेही वाचा – शत्रूच्या हल्ल्यात पुण्यातील जवान हवालदार दिलीप ओझरकर शहीद
पुढील ४८ तासांत पुण्येश्वर मंदिराच्या परिसरातील मशिदीच्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली.