चिखली- कुदळवाडीतील अतिक्रमण कारवाईबाबत आमदार महेश लांडगे यांनी पहिल्यांदाच स्पष्ट भूमिका मांडली आहे. पिंपरी- चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून कुदळवाडी- चिखली परिसरातील अनधिकृत भंगार व्यावसायिक, अवैध धंदे आणि इंद्रायणी नदी प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी भूमिका आम्ही सातत्त्याने मांडत आलो आहोत.

महेश लांडगे म्हणाले, महानगरपालिका प्रशासनाने कुदळवाडी-चिखली भागात भारतातील सर्वात मोठी अतिक्रमण कारवाई केली. पहिल्या दिवशी दि. ८ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान एकूण ४ हजार १११ अतिक्रमणांवर कारवाई झाली. यामध्ये एकूण ३ कोटी ६० लाख ५८ हजार ७४६ चौरस फूट क्षेत्रावरील म्हणजे सुमारे ८२७ एकर क्षेत्रावरील अतिक्रमण निष्कासित करण्यात आले. या कारवाईमुळे महापालिकेचे रस्ता आणि आरक्षणांसाठीचे एकूण १०० एकर क्षेत्र अतिक्रमणमुक्त झाले आहे.

पुढे ते म्हणाले, इंद्रायणी प्रदूषण, वायू व ध्वनी प्रदूषण, अवैध धंदे, वाढती गुन्हेगारी आणि आगीच्या घटना यांना प्रतिबंध करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर कारवाईसाठी महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासनाला पाठबळ दिले. याबाबत त्यांचे आणि प्रशासनाचेही आभार व्यक्त करतो.

परंतु, प्रशासनाने केलेल्या सरसकट कारवाईमुळे ५५९ लघु उद्योजक आणि १०३ भूमिपुत्रांचे नुकसान झाले आहे. याचे आम्ही कदापि समर्थन करणार नाही. याबाबत महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारकडे दाद मागणार आहोत. दि. ७ फेब्रुवारी १७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान अतिक्रमण कारवाई दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल. या कारणास्तव ‘सोशल मीडिया’ किंवा जाहीरपणे भूमिका व्यक्त करु नये, असेे प्रशासनाच्या बैठकीत ठरले होते. त्यामुळे आता स्पष्ट भूमिका मांडत आहे. अस आमदार महेश लांडगे म्हणाले आहेत.

Story img Loader