Pune Porsche Car Accident : पुण्यात रविवारी पहाटे पोर्श कारने बाईकवरुन जाणाऱ्या दोघांना धडक दिली. ज्यात त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. पुण्यातल्या कल्याणीनगर भागात ही घटना घडली. या अपघाताची चर्चा अजूनही सुरु आहे. दरम्यान, या अपघाताबाबत आता आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी काही वर्षांपूर्वीचा एक प्रसंग सांगितला आहे.

नेमकं काय म्हणाल्या सोनाली तनपुरे?

“पुणे अपघात प्रकरणातील मुलगा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून आम्हाला आमच्या मुलाची शाळा बदलावी लागली” असं सोनाली तनपुरे यांनी सांगितलं.

MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Milind Gawali
मिलिंद गवळींची अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट; म्हणाले, “कदाचित म्हणूनच इतक्या वर्षांनंतर…”
auto driver who rushed saif ali khan refused to disclose amount he got
जखमी सैफला रिक्षातून रुग्णालयात नेणाऱ्या चालकाला किती बक्षीस मिळालं? म्हणाला, “माझ्यासाठी तो…”
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या…”, या वक्तव्यानंतर मंत्री विखेंची सारवासारव; म्हणाले, “मी गंमतीने…”
Marathi actor saurabh gokhale
“मराठी हॉटेल मालकांचे परप्रांतीय वेटर, मॅनेजर…”; मराठी अभिनेता पोस्ट करत म्हणाला, “बेताल, बेलगाम…”
Shiv Sena is unhappy after Yogesh Kadam from Ratnagiri district was left out of the list for the post of Guardian Minister
योगेश कदम यांना डावलले
Ajit Pawar
Ajit Pawar : “येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेसचा…”, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं शिर्डीत महत्वाचं विधान

“मृत्यू झालेल्या दोघांच्याही कुटुंबाला न्याय मिळावा”

पुढे बोलताना, “तेव्हाच्या काही घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता”, असेही त्या म्हणाल्या. तसेच “पुण्यात झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा”, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा – पोर्श अपघात प्रकरणी मोठी अपडेट! अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह बार मालक आणि मॅनेजरलाही अटक

पुणे अपघात प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?

रविवारी पहाटे पुण्यातल्या कल्याणीनगर भागात ही अपघाताची घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. तसेच त्याला रविवारी दुपारी विशेष हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात यावी तसंच आरोपी साडेसतरा वर्षांचा असल्याने त्याला प्रौढ समजून खटला चालवला जावा, अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत आरोपीला जामीन मंजूर केला होता. तसेच अपघातावर ३०० शब्दाचा निबंध लिहावा, असे आदेश दिले.

दरम्यान, अपघातानंतर मंगळवारी पोलिसांनी या प्रकरणातील अल्पयवीन आरोपीच्या वडिलांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली तसेच बार मालक आणि मॅनेजरला पुण्यातून अटक केली. त्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत याप्रकरणी आरोपीवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दिली. राज्याचे मुख्यमंत्री यांनीही आरोपींवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली. तसेच आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पुणे पोलिसांना दिले.

Story img Loader