लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : पावसाने पाठ फिरवल्याने राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये सध्या दुष्काळ आहे. पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. तर दुसरीकडे, सातत्याने बेरोजगारी, महागाई वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकही आर्थिक संकटात आहे. या स्थितीत जनतेला सवलती आणि आर्थिक मदत देण्याऐवजी एसटी बसच्या तिकीट दरात वाढ करणे जाचक आणि अन्यायकारक आहे. ही दरवाढ सरकारने तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एसटी बसच्या तिकीट दरात ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून १० टक्के वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाला विरोध दर्शवत आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दरवाढ मागे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

आणखी वाचा-जनकल्याणासाठीच मी आणि अजित पवार एकत्र, चंद्रकांत पाटील यांची भूमिका

सध्याच्या दुष्काळाच्या आणि दररोज वाढणाऱ्या महागाईच्या वातावरणात दिवाळी हा सण साजरा कसा करायचा, हा प्रश्न राज्यातील जनतेसमोर आहे. अशा स्थितीत आणि ऐन सणासुदीच्या काळात राज्य सरकारने बसच्या तिकीट दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचा हा निर्णय अतिशय अन्यायकारक आहे. त्यामुळे सरकारने संवेदनशीलता दाखवून तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, असे धंगेकर यांनी म्हटले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla ravindra dhangekars request to chief minister show sensitivity roll back st rate hike pune print news apk 13 mrj
Show comments