पुणे : कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेवाराला पाठिंबा देण्याची घोषणा मनसेने केल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे स्वागत पदाधिका-यांनी केल्यानंतर भाजपने मनसेची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी  मनसेच्या प्रमुख नेत्यांच्या निवासस्थानी जाऊन शुक्रवारी भेटी घेतली. मनसेचा भाजपलाच पाठिंबा असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

हिंदुत्व आणि विकास हे दोन्ही मुद्दे प्रभावशाली पद्धतीने पुढे नेणारा भारतीय जनता पक्ष आहे. त्यामुळेच कसबा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला पूर्ण सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे घेतला असल्याचे मत प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी व्यक्त केले.चव्हाण यांनी मनसे नेते दीपक पायगुडे, बाळा शेडगे, सुशिला नेटके, अजय शिंदे, प्रल्हाद गवळी यांच्या सह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.

Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Devendra Fadnavis On Local Body Election
Devendra Fadnavis : आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढील तीन-चार महिन्यांत…”
ncp leader ajit pawar launch connect with people initiative
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा जनता संवाद उपक्रम; आठवड्यातील तीन दिवस मंत्री पक्षाच्या मुख्यालयात
article about ugc revises vice chancellor selection process
समोरच्या बाकावरून : मांजराच्या पावलांनी ती येते आहे…
BJP maharashtra Working president Ravindra Chavan
Ravindra Chavan: रवींद्र चव्हाण यांची अखेर भाजपाच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी वर्णी; राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांची घोषणा
Hasan Mushrifs statement regarding post of Guardian Minister of kolhapur
पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांकडे जायचंय – हसन मुश्रीफ
dhananjay Munde
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजपचा दबाव; मित्रपक्षाच्या नेत्यांची आक्रमक भूमिका

हेही वाचा >>> पुणे: अंथरूणाला खिळलेल्या खासदार गिरीश बापटांना प्रचारात उतरविण्याची वेळ भाजपवर का आली?

 चव्हाण म्हणाले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे.  विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसे महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राज ठाकरे दोन दिवसात पुण्यात येणार आहे, त्यांचे मार्गदर्शन आणि नियोजनाप्रमाणे काम अधिक गती घेईल. त्यामुळे कसबा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना मोठे बळ मिळाले असून विक्रमी मताधिक्याने विजय होईल असा विश्वास वाटतो.

Story img Loader