जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात घडलेलं सत्तानाट्य आणि त्यानंतर झालेल्या सत्तापालटानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची राज्यातील सत्ताधाऱ्यांबरोबरची जवळीक वाढल्याचं चित्र पहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होण्यास भाग पाडून भारतीय जनता पार्टीबरोबर सत्ता स्थापन करुन मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मागील सहा महिन्यात अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांनिमित्त भेटीगाठी झाल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ शिंदे गट आणि भाजपाबरोबर मनसेचा हा वाढता घरोबा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकदा तर मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपा, मनसे आणि शिंदे गट एकत्र लढणार की काय इथपर्यंतचे प्रश्न थेट दोन्ही पक्षांमधील मोठ्या नेत्यांनाही विचारण्यात आले. मात्र बुधवारी पुण्यात पार पडलेल्या एका कार्यक्रमात एका पुणेकरानेच राज ठाकरेंशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदेंचा असा काही उल्लेख केला ही राज यांनी कपाळाला हात मारला.

सहजीवन व्याख्यानमालेत ‘नवं काहीतरी’ या विषयावर बोलताना मनसे अध्यक्ष ठाकरे यांनी राज्यातील राजकारण, राजकारण्यांचा सामान्यांच्या जीवनावर होणार परिणाम, पुणे मेट्रो, मुंबईची झालेली सध्याची स्थिती अशा अनेक विषयांना स्पर्श केला. जाणत्या जनांनी राजकारणात यावे, तरच महाराष्ट्राची सुसंकृत राजकीय ओळख पुन्हा प्रस्थापित होईल असं राज म्हणाले.

नक्की वाचा >> पुणे: …अन् सावकरांच्या विचाराची फ्रेम भेट म्हणून मिळताच राज ठाकरेंनी दाखवली ‘ती’ चूक; वसंत मोरेंकडे पाहून म्हणाले, “एक…”

राज ठाकरेंनी भाषण दिल्यानंतर काही मोजक्या लोकांना त्यांना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली. त्यावेळी राज यांना एका पुणेकराने मशिदींवरील भोंग्यांसंदर्भातील कामासाठी शुभेच्छा देतानाच हे काम अशीच सुर ठेवण्याची विनंती केली. विशेष म्हणजे या वेळेस आपल्या भावना व्यक्त करताना या पुणेकराने शिंदेंचा असा काही उल्लेख केला का राज यांनी कपाळावरुन हात मारुन घेतला.

नक्की वाचा >> “मुक्ता टिळक भाजपाच्या असल्या तरी…”; कसब्यातून पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या रुपाली पाटील-ठोंबरेंना पक्षाकडून घरचा आहेर

“तुम्ही मध्यंतरी भोंग्यांचा, ध्वनीप्रदुषणाचा प्रश्न उचलला होता, तो तुम्ही लावून धरा अशी माझी विनंती आहे. कारण सर्व पुणेकरांना त्यापासून खूप त्रास होतो. भोगे असतील किंवा गणेशोत्सवातील आवाजाची मर्यादा पाळजी जात नाही. त्याचा पुणेकरांना फार त्रास होतो. हा त्रास कायमचा तुम्हीच संपवू शकता. कारण साहेब सध्या तुमचे मुख्यमंत्री आहेत,” असं या पुणेकराने म्हणताच राज ठाकरेंनी आश्चर्याने एकदम वर पाहिलं.

नक्की वाचा >> “शीशे मे रेहनेवाले घर मे…”; फडणवीसांनी हिंदीमिश्रीत मराठीत केलेल्या ‘त्या’ कमेंटने पिकला एकच हशा! CM शिंदेंनाही हसू अनावर

एकनाथ शिंदेंचा ‘तुमचे मुख्यमंत्री’ असा उल्लेख ऐकताना राज यांनी कपाळाला हात लावला. त्यानंतर या व्यक्तीने, “तुमचे मुख्यमंत्री म्हणजे तुमच्या फेव्हरमधले मुख्यमंत्री आहेत,” असं स्पष्टीकरण दिलं. मात्र या पुणेकराने व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरात बोलताना केलेल्या या विधानामुळे उपस्थितांत एकच हशा पिकला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray reaction after hearing that eknath shinde is cm favoring him scsg